video  Dainik Gomantak
गोवा

कट्टर राष्‍ट्रवादाचे ओंगळवाणे प्रदर्शन; अल्पसंख्याकांना दमदाटी

कळंगुटमधील प्रकार; गुडघ्यावर बसून म्हणायला लावले ‘भारत माता की जय’

दैनिक गोमन्तक डिजिटल

कळंगुट या भागात धार्मिक सलोख्‍याला गालबोट लावणारी घटना गेल्या दोन दिवसांपूर्वी येथे घडली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक पोलिसांनी अद्याप कोणाहीविरुद्ध तक्रार नोंदविलेली नाही.

जो स्थानिक माणूस- बहुसंख्याकांनी लक्ष्य बनविला- तो एका व्हिडिओत केवळ म्हणतो, ‘ही मुस्लीम वस्ती आहे. हे रहिवासी न्यूझीलंडला नाही तर पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देतात...’, असे मत व्यक्त करताना ही व्यक्ती शांतपणे बोलते व त्यांनी जे काय पाहिले, त्याचीच माहिती देते. सदर व्यक्ती कळंगुटला रेस्टॉरंट चालविते.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये या रेस्टॉरंट मालकाला काही स्‍थानिकांच्‍या झुंडशाही व धाकदपटशासमोर झुकावे लागते असे दिसते. जमावातील व्‍यक्‍तींचे चेहरे दिसत नाहीत; परंतु ते अत्यंत उग्र बोलतात. ते स्थानिक मुस्लीम नागरिकांना जाब विचारताना दिसतात.

‘तुम्ही पाकिस्तान झिंदाबाद म्हटलेच कसे? तसे करायचे असल्यास तुम्ही येथे का वास्तव्य करता? जा पाकिस्तानमध्ये! येथे आम्हाला जर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा ऐकायला आल्या तर तुम्हाला पाकिस्तानात सरहद्दीवर सोडून यायला आम्ही कमी करणार नाही, हे ध्यानात ठेवा...

तुम्‍हाला दुकान बंद करावे लागेल. तुम्ही पाकिस्तानच्या नावाने घोषणा देणार आणि आम्ही गोवेकर गप्प बसणार, असे वाटत असेल तर ती तुमची चूक आहे...’’, अशी तंबी अल्पसंख्याकांना दिली जात असल्याचे दुसऱ्या व्हिडिओत दिसते.

ज्यांना धमकावले जातेय ते गरीब तसेच खाटीक व्यावसायिक आहेत, असे त्यांच्या पेहरावावरून दिसते. या धमक्यांना अल्पसंख्याक कोणतेच प्रत्युत्तर देत नाहीत, शांतपणे ऐकून घेतात.

तिसऱ्या व्हिडिओत रेस्टॉरंटच्या मालकाला धमक्या देत त्याला गुडघ्यावर बसून, कान धरून माफी मागायला लावली जाते. ‘‘हा भाग मुस्लीम असे तुम्ही म्हटलेच कसे?’’, असे त्याला विचारले जाते.

‘‘हा भाग मुस्लीम म्हणून तुम्हाला कोणी सांगितले? तुझ्यासारखे गोवेकरच ही असली भाषा करतात ते आम्हाला चालणार नाही,’’ असे सांगून रेस्टॉरंटच्या मालकाला हा जमाव गुडघ्यावर बसून, कान धरून माफी मागायला लावतो.

एवढेच नव्हे तर ‘भारत माता की जय’ म्हणायला लावतो. शेवटी तर तेथे जमलेल्या सर्वांनाही मोठ्‍या मोठ्‍याने ‘भारत माता की जय’ घोषणा द्यायला भाग पाडले जाते.

पोलिसांकडून पुष्टी

कळंगुट पोलिसांना विचारता, हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्याचे त्यांनी मान्य केले. दुसरा, तिसरा व्हिडिओ कालचाच आहे, अशी माहिती त्यांनी दिली. न्यूझीलंड-पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू असताना एका विदेशी प्रवाशाने कळंगुटला व्हिडिओ बनवला होता.

त्यावेळी सदर रेस्टॉरंट मालकाने ‘येथे पाकिस्तानला पाठिंबा आहे; कारण मुस्लीम वस्ती आहे’’ असे एक सर्वसाधारण मत व्यक्त केले होते.

आपल्या देशात राष्ट्रवाद हा धर्मासारखाच कट्‍टर बनला आहे व तो विविध समुदायांना शांततेने एकत्र नांदण्याच्या, सहजीवनाच्या तत्त्वाला सुरुंग लावतो. हा कट्टरवाद घातक आहे, ज्याचा बीमोड झाला पाहिजे.

- डॉ. मुकूल रायतूरकर, प्रागतिक विचारवंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT