Kindal Tree fell on the shed  Dainik Gomantak
गोवा

दुर्दैवी घटना ! झाड कोसळून माय-लेकाचा अंत; बेतकी-खांडोळ्यातील घटना

किंदळाचे झाड पत्र्याच्‍या शेडवर पडल्याने प्राणहानी

गोमन्तक डिजिटल टीम

Kindal Tree Fell on the Shed: बेतकी येथील आनकल्लेवाडा (कुलकर्णीवाडा) भागातील पत्र्याच्या शेडवर किंदळाचे झाड कोसळल्‍याने त्‍याखाली सापडलेल्‍या माय-लेकाचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना आज संध्याकाळी साडेसहा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.

जखमी अवस्‍थेतील अंजली अमित वाडकर (वय ३६) व भावेश अमित वाडकर (वय ९) यांना बेतकी आरोग्‍य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्‍यात आले असता तेथे भावेशला मृत घोषित करण्‍यात आले; तर गोमेकॉत नेण्‍यात येत असताना अंजली यांची वाटेतच प्राणज्‍योत मालवली.

आनकल्लेवाडा येथे वाडकर कुटुंबीयांचे घर असून घराशेजारीच पत्र्याची शेड आहे. तेथे अंजली वाडकर चुलीवर पाणी गरम करीत होत्या. यावेळी सोबत त्‍यांचा मुलगा भावेशही होता. आज दिवसभर पाऊस होता. शिवाय संध्याकाळी पाऊस आणि वाराही मोठ्या प्रमाणात सुटला होता. त्यामुळे किंदळाचे झाड उन्मळून पत्र्याच्या शेडवर कोसळले.

या शेडचे चिऱ्यांचे खांब व पत्रे जमीनदोस्त झाले, त्यात अंजली व भावेश सापडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी मोठा आवाजही झाला. तत्‍काळ घरातील लोक धावून आले. दोघांनाही बाहेर काढण्‍यासाठी अमित वाडकर यांनी शर्थीचे प्रयत्‍न केले.

खेळत होती म्‍हणून मुलगी बचावली

अमित वाडकर हे शेडबाहेर होते. वाऱ्यामुळे किंदळाचे झाड जोरात हलत असल्याचे पाहून त्यांनी पत्नी व मुलाला बाहेर येण्यासाठी हाक दिली; मात्र वारा जोरात असल्याने दोघांनाही त्यांची हाक ऐकायला आली नाही.

काही क्षणातच ते किंदळाचे झाड शेडवर कोसळले आणि माय-लेक त्यात गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा अंत झाला. हा सगळा प्रकार वडील अमित यांच्‍या डोळ्यांसमोर घडला.

त्यांनी खूप प्रयत्न करून दोघांनाही बाहेर काढले. यावेळी त्यांची मुलगी घरात खेळत असल्याने ती या दुर्घटनेतून सुदैवाने बचावली. मुलगी भावेशपेक्षा लहान आहे.

निर्जनस्थळी घर

आनकल्लेवाडा येथे वाडकर यांचे एका बाजूला निर्जनस्‍थळी घर आहे. त्यामुळे या परिसरात घटनेची माहिती पसरण्यास वेळ लागला. झाड पडल्याचा आवाज शेजाऱ्यांच्या कानी पडला होता; मात्र शेड पडल्याची कल्पना त्यांना आली नाही. या शेडमध्ये एक दुचाकी आणि एक चारचाकी ठेवलेली होती.

दोघांच्या डोक्याला गंभीर इजा : चिऱ्यांचे खांब कोसळून दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला. त्यामुळे बेतकी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच भावेशने प्राण सोडले होते.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मंत्री गोविंद गावडे यांनी इस्पितळात धाव घेतली आणि वाडकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. म्हार्दोळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेहांची सोमवारी उत्तरीय तपासणी होणार आहे.

मनमिळाऊ अंजली

अंजलीचे सासरे अनंत वाडकर यांचे संपूर्ण कुटुंबच मनमिळाऊ आणि सौजन्यशील. अंजली मनमिळाऊ होत्या. एक सुखी आणि शिक्षित कुटुंब असल्यामुळे मुलांचे शिक्षण, घरची कामे करण्यात त्या व्यस्त असायच्या.

भावेश पाचच दिवस गेला शाळेत

भावेश हा मामाच्या गावी म्हणजे, गावणे येथे पहिली ते तिसरीपर्यंत शिकला. यंदाच तो चौथ्या वर्गात बेतकी प्राथमिक मराठी शाळेत शिकण्यासाठी आला होता. या शाळेत तो केवळ पाचच दिवस गेला.

शनिवारी सरकारने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे तो आनंदीही होता. सोमवारी शाळेत पुन्हा जाणार, नवी शाळा, नवे शिक्षक, नवे मित्र याबद्दल तो घरी बोलत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT