Fatorda Police Arrested Gold Thief Dainik Gomantak
गोवा

Fatorda: सराफ दुकानातून सोन्याचे 3.5 लाखाचे ब्रेसलेट चोरणाऱ्याला दाबोळी विमानतळावर अटक

फातोर्डा पोलिसांची कारवाई

Akshay Nirmale

पणजी येथील सराफ दुकानातून सुमारे साडे तीन लाख रूपयांचे सोन्याचे ब्रेसलेट पळवून नेणाऱ्या संशयित चोरट्याला फातोर्डा पोलिसांनी शिताफीने विमानतळावर अटक केली. पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक होत आहे. (Fatorda Police Arrested Gold Thief)

याबाबत पुंडलिक लोटलीकर यांनी तक्रार दिली होती. ते पणजीतील ब्ल्यू स्टोन ज्वेलरी शॉपमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. या दुकानात आलेल्या संशयित युवराज अगरवाल याने दागिने खरेदीच्या बहाण्याने सोन्याचे ब्रेसलेट पाहिले.

पण त्याने सोन्याच्या ब्रेसलेटचे पैसे न देताच ब्रेसलेट घेऊन पोबारा केला. 15.6 ग्रॅमच्या या सोन्याच्या ब्रेसलेटची किंमत 3 लाख 34 हजार रूपये इतकी आहे.

पुंडलिक लोटलीकर यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र नाईका यांनी सांगितले की, चोरीनंतर पुंडलिक लोटलीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही संबंधित संशयिताचा माग काढायला सुरवात केली.

संशयित चोरट्याचे नाव युवराज अगरवाल असे आहे. तो मूळचा हैदराबाद येथील आहे.

पोलिसांनी माग काढल्यावर त्यांना युवराज अगरवाल हा पर्वरी, कळंगुट भागात असल्याचे समजले. त्यानंतर तो तिथून दाबोळी विमानतळाच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याला विमानतळावर पकडले.

त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे इतरही चोऱ्यांप्रकरणी चौकशी केली जात आहे. दरम्यान, फातोर्डा पोलिसांनी चपळाईन केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT