Crime News  Dainik Gomantak
गोवा

Quepem Crime News: केपे येथे गाडीवर रंग टाकल्यावरून युवकावर जीवघेणा तलवार हल्ला

स्थानिक नागरिकांची पोलिस ठाण्यावर धडक; 6 जणांना अटक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Quepem Crime News: गाडीवर रंग टाकला या क्षुल्लक कारणावरून कट्टा-आमोणा येथील प्रज्योत नाईक या युवकावर काल मंगळवारी रात्री तलवार व सुऱ्याने जीवघेणा हल्ला करण्‍यात आला होता.

या प्रकाराचा निषेध म्‍हणून स्थानिक लोकांनी आज केपे पोलिस स्‍थानकावर धडक देऊन हल्ला करणाऱ्या युवकांवर कठोर कारवाईची मागणी केली.

त्‍यानुसार पोलिसांनी त्‍वरित तपासाची चक्रे फिरविली व कुख्यात गुंड किंग्सले फर्नांडिस (अवेडे), जोसेफ फर्नांडिस (राय), रियाझ अहमद (नावेली), ॲश्‍‍ली कार्व्हालो (मायणा-कुडतरी), वॉल्टर फर्नांडिस (राय) व सायमन साल्‍ढाणा (कासावली) या 6 जणांना अटक केली आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टा-आमोणा येथील स्थानिक युवक काल होळी खेळत असताना किंग्सले फर्नांडिस हा आपल्या चारचाकी गाडीने जात होता. यावेळी एका युवकाने त्याच्या गाडीला रंग लावल्याने तो भडकला. त्‍यांच्‍यात बाचाबाची झाली.

नंतर रात्री 10 वाजता किंग्सले आपल्या आणखी चार साथीदारांसह कट्टा-आमोणा येथे दाखल झाला व प्रज्योत नामक युवकावर तलवार व सुऱ्याने प्राणघातक हल्ला चढविला. त्‍यात तो गंभीर जखमी झाला. या गुंडाने एवढ्यावरच न थांबता प्रज्‍योतचे अपहरण करण्यासाठी त्‍याला आपल्‍या गाडीत कोंबून पुन्‍हा मारहाण केली.

यावेळी प्रज्योतच्या मित्रांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. त्‍यांनी अखेर केपे पोलिसांनी या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन 5 जणांना ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT