Bogmalo Landslide Dainik Gomantak
गोवा

Bogmalo Landslide: बोगमाळो चर्चच्या मागील गॅरेजवर कोसळली दरड; चर्चच्या पुरातन वस्तूंसह कारचे नुकसान

सुदैवाने टळला अनर्थ, धोक्‍याची टांगती तलवार कायम

Akshay Nirmale

Bogmalo Landslide: दक्षिण गोव्यातील बोगमाळो येथे दरड कोसळल्याची घटना मंगळवारी घढली. चर्चच्या मागे मंगळवारी पहाटे 6 वाजता दरड कोसळली. यात धर्मगुरुंच्या चारचाकी गाडीचे तसेच चर्चच्या पुरातन वस्तूंचे नुकसान झाले.

तरीसुद्धा धोका कायम आहे. या परिसरात एक संरक्षक भिंत बांधण्याची योजना असल्याचे बोगमाळो सरपंच संकल्प महाले यांनी सांगितले.

काल मध्यरात्री सुमारे पावणे दोनच्‍या सुमारास पावसाच्या तडाख्यात बोगमाळो चर्चच्या मागे दोन मोठे दगड डोंगरावरून कोसळून खाली आले चर्च धर्मगुरूंच्या चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने धर्मगुरूंनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा गॅरेजमधील वाहनावर मोठा दगड स्थिरावलेला दिसला.

तसेच या ठिकाणी असलेल्या चर्चच्या पुरातून वस्तूंचेही नुकसान झाले. गॅरेजची हानी झाली. सरपंच संकल्प महाले यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वास्को अग्निशमन दलाचे जवानांनी दगड दूर केले.

दरम्यान, धोका अजून टळलेला नसून आणखी मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची भीती व्‍यक्त केली जात आहे. त्‍यामुळे चर्चलाही धोका निर्माण झालाय. या परिसरात एक संरक्षक भिंत बांधण्याची गरज असल्याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT