Fire  Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: नागमोडे-नावेलीत भंगार अड्डा बेचिराख

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण तीन बंबांचा वापर करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

चंद्रवाडा-फातोर्डा येथे काही दिवसांपूर्वी एका भंगार अड्ड्याला आग लागून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचा प्रकार घडलेला असतानाच आता नागमोडे-नावेली येथील एका भंगार अड्ड्याला भीषण आग लागली आणि संपूर्ण यार्ड बेचिराख झाला. ही घटना गुरुवारी (ता.९) रात्री घडली.

मडगाव अग्निशमन दलाने पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणली, तर सकाळी पुन्हा आग लागल्याने अग्निशमन दलाचे जवान नागमोडेमकडे परतले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण तीन बंबांचा वापर करण्यात आला.

घटनास्थळी असलेल्या एकाने माहिती देताना सांगितले की, भंगार अड्ड्यात आग पसरण्यापूर्वी संपूर्ण अंगणात ती लागली असण्याची शक्यता आहे. अनेक लोक रात्री उशिरा भंगार अड्ड्याजवळ बसतात. ते गेल्यानंतर या ठिकाणी आग लागली असावी. या आगीची माहिती प्राप्त झाल्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात येत नसल्याने अर्ध्या तासानंतर दुसरा पाण्याचा बंब मागवण्यात आला.

जेसीबी मशीनच्या वापराची मागणी

याविषयी माहिती देताना एका फायरमनने सांगितले की, उष्णतेमुळे या ठिकाणी आगीची पुनरावृत्ती होऊ शकते आणि आग पूर्णपणे विझविण्यासाठी आग लागलेला कचरा बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनचा उपयोग करण्याची मागणी केली आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT