Tourist Assault Viral Video Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, Viral Video

Goa Tourist Fight Viral Video: कांदोळीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या काही पर्यटकांनी त्यांच्याच सोबत असलेल्या एका पर्यटकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस

Akshata Chhatre

Goa Candolim Maharashtra Tourist Fight Viral Video

गोवा: गोव्यातील पर्यटनाविषयी सध्या अनेक चित्र-विचित्र चर्चा सुरु आहेत. काहीवेळा पर्यटकांमुळे स्थानिक त्रस्त असल्याच्या तर दुसरीकडे महागड्या किमतींमुळे गोव्यात येणारे पर्यटक इतरत्र पर्यायांच्या शोधात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) उत्तर गोव्यात एक गंभीर घटना घडली.

कांदोळी हे गाव पर्यटनासाठी बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे आणि गुरुवारी रात्री कांदोळीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या काही पर्यटकांनी भररस्त्यात अक्षरश: धूडगूस घातला. पर्यटकांमध्ये आपआपसात मारामारी झाली. मारहाणीचे नेमके कारण काय होते, हे अद्याप समजू शकलेले नाही.

गोव्यातील एका वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये चार-पाच लोकं त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला मारताना दिसतायेत. कांदोळीच्या रस्त्यावर हा प्रकार सुरु होता.

गोव्यात आलेले काही पर्यटक त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला शिवीगाळ देखील करीत होते. व्हिडीओमध्ये ही लोकं त्यांच्याच सहकाऱ्याला गाडीत खेचत आणखीन मारझोड करताना दिसतायेत.

स्थानिकांना या घटनेचा अंदाज येताच त्यांनी पर्यटकांची चौकशी सुरु केली, मात्र "सर्वांनी हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही यात पडू नका" असे उत्तर दिले. मारहाण करणाऱ्यांनी कारण स्पष्ट केलेच नाही मात्र ती व्यक्ती आपल्या बहिणीचा नवरा असल्याचा दावा केला. स्थानिकांनी मारहाण झालेल्या व्यक्तीला देखील "ही लोकं तुला मारत आहेत का?" असा प्रश्न केला आणि त्यावर ती व्यक्ती उत्तर देत असतानाच बाकी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिकांनी या पर्यटकांना रोखून एकूण प्रकारची माहिती गोवा पोलिसांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT