Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: बहिणीला शाळेत सोडायला गेलेली युवती अपघातात ठार

Goa Accident Death: शिरदोन येथील घटना : 2 दुचाकींची धडक

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: शिरदोन येथे दोन दुचाकी वाहनांमध्‍ये झालेल्‍या अपघातात संजना सावंत (21, मधलावाडा-शिरदोन) या युवतीचा मृत्यू झाला.

तर, तिची बहीण अक्षता सावंत (17, शिरदोन) आणि दुसरा दुचाकीस्‍वार ओमकार आरोस्कर (18, पिलार) गंभीर जखमी झाला असून, त्‍यांच्‍यावर इस्‍पितळात उपचार सुरू आहेत.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज मंगळवारी सकाळी घडला. संजना सावंत आणि तिची बहीण अक्षता सावंत शिरदोनकडून पिलारच्या दिशेने आपल्या दुचाकीने (जीए ०७ एजे ३५५९) जात होती तर ओमकार आरोस्कर हा शिरदोनच्या दिशेने दुचाकी (जीए ०७ व्ही ०८१२) घेऊन येत होता.

शिरदोन बाजाराजवळच्या रस्त्यावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात संजना उसळून रस्त्यावर पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

गोमेकॉत नेताना वाटेत तिची प्राणज्योत मालवली. अक्षता सावंत आणि ओमकार आरोस्कर यांच्‍यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी ओमकार आरोस्कर याच्‍याविरोधात भादंसच्या कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

पिलार येथे शिक्षण

अक्षता ही पिलार येथील फादर आग्नेल उच्च माध्‍यमिक विद्यालयात बारावी वाणिज्य शिकत आहे. तिला शाळेत सोडण्यासाठी संजना दुचाकीने आली होती. तर, ओमकार हा त्‍याच विद्यालयाचा बारावी कला शाखेचा विद्यार्थी आहे. तो शिरदोन येथे आपल्या मित्राला आणण्यासाठी जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT