Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर गुजरातच्या महिलेचा जवानांशी वाद

तक्रार दाखल, शिविगाळ आणि सुरक्षा कमचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप

Akshay Nirmale

Dabolim Airport: गुजरातच्या एका महिलेने दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

तिच्या विरोधात शिविगाळ आणि सुरक्षा कमचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

जयनी जयेश शाह (वय 31) असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची जैन मंदिरासमोर एलोरा पार्क सोसायटी, चार रस्ता नारायणपुरा अहमदाबाद (गुजरात) येथील आहे. ही महिला विमानातून उतरल्यानंतर चेकिंग प्रक्रियेतून जात होती. यावेळी सीआयएसफ (CISF) जवानांकडून प्रवाशांची तपासणी केली जात होती.

यावेळी या महिलेने तपासणीला विरोध करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच तिने चेकिंगशिवाय जाण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगुनही युवतीने त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यांना सहकार्य करण्यास नकार दिला. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT