Fatorda fire News Dainik Gomantak
गोवा

फातोर्डा येथे चारचाकी वाहनाला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

वाहनाने अचानक पेट घेतला

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : फातोर्डा येथील कोलवा जंक्शन सर्कल जवळ रात्री सात वाजण्याच्या दरम्यान चारचाकी वाहनाला आग (fire) लागली. गाडीत असलेल्यांनी प्रसंगावधन राखून बाहेर धाव घेतल्याने ते बालंबाल बचावले. मात्र यात गाडीच नुकसान झाले आहे.

हे चारचाकी वाहन गेबी फेर्नांडीस यांच्या मालकीचे असून रात्री सात वाजण्याच्या सुमारास मडगाव येथील कोलवा सर्कल जवळ हे वाहन पोचले असता, या वाहनाने अचानक पेट घेतला यावेळी ड्राइवर सहित आणखी तिघाजणांनी प्रसंगवाधन राखून गाडीच्या बाहेर धाव घेतली आणि हे चौघे जण बालंबाल बचावले.

या आगीची माहिती मडगावच्या (Margao) अग्निशमन दलाला मिळताच दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असता त्यापूर्वी हे चारचाकी वाहन संपूर्ण जळून खाक झाले होते. कोलवा सर्कलच्या मोक्याच्या ठिकाणी या गाडीला आग लागल्याने येथील ठिकाणी काही वेळासाठी वाहतुकीची कोंडीही झाली होती. या दरम्यान, फातोर्डा पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून इतर वाहनांना वाट करून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT