Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: फ्लॅटला आग, लाखोंची हानी; महिला बचावली

Goa Fire Case: डिचोली येथील आयडीसी परिसरात काल शनिवारी रात्री एका फ्लॅटला आग लागून पाच लाखांपेक्षा जास्‍त किमतीचे साहित्य जळून खाक झाले.

दैनिक गोमन्तक

Goa Fire Case: डिचोली येथील आयडीसी परिसरात काल शनिवारी रात्री एका फ्लॅटला आग लागून पाच लाखांपेक्षा जास्‍त किमतीचे साहित्य जळून खाक झाले. तर, फ्लॅटमध्ये अडकलेल्या अन्नपूर्णा गौडा यांनी प्रसंगावधान ओळखून वेळीच बाहेर धाव घेतल्याने त्या सुखरूप बचावल्या.

आग लागली त्यावेळी फ्लॅटमधील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. येथील मुस्लिमवाड्याजवळील ‘हरूण आशियाना’ या इमारतीतील फ्लॅटमध्ये काल मध्यरात्री साडेबाराच्‍या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही दुर्घटना घडली, त्यावेळी अन्नपूर्णा या एकट्याच फ्लॅटमध्ये होत्या. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आगीची ही घटना त्‍यांच्‍या निदर्शनास आली.

त्यावेळी फ्लॅटमध्ये आगीने पेट घेतला होता. कशीबशी त्‍यांनी बाहेर धाव घेत शेजाऱ्यांना उठविले. शेजाऱ्यांनी धावपळ करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा आगीने उग्र रूप धारण केले होते.

किमती साहित्य जळून झाले खाक

आगीवर नियंत्रण मिळविले, परंतु तोपर्यंत फ्‍लॅटमधील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी किमती साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT