Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: 'त्या' स्टॉल धारकांचा गोमेकॉ समोर जमाव

गुरुवारी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) इस्पितळाच्या बाहेर असलेले गाडे (Stall) आज पहाटेपासून हटविण्यास सुरुवात झाली होती(Goa)

दैनिक गोमन्तक

दोन दिवसापूर्वी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या(Goa Medical Collage) आवाराच्या बाहेरील गाडे जिल्हाधिकार्‍यांनी जमीनदोस्त केल्यानंतर आज या स्टॉलधारकांनी त्या ठिकाणी जमा होऊन त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली

या गोवा मेडिकल कॉलेजच्या आवाराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोक जमले असून पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे

त्या ठिकाणी सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस तसेच सांताक्रुज पंचायतीचे सदस्य उपस्थित आहेत. गेल्या गुरुवारी हे स्टॉल्स जमीनदोस्त केल्या नंतर सांताक्रूझच्या आमदार टोनी फर्नांडिस व सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या स्टॉलधारकांना न्याय देण्याची मागणी केली होती. तसेच त्यांना पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते तसेच तेथे असलेल्या फळ विक्रेत्यांना तात्पुरते पुन्हा बसण्यात देण्यात येईल असेही आश्वासन दिले होते.

आज फळविक्रेते आपला व्यवसाय सुरू करण्यास आले असता पोलिसांनी त्यांना तिथे अटकाव केला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कोणालाही तिथे सध्या व्यवसाय करता येणार नाही असे पोलिसांनी या जमावाला सांगितले त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान गुरुवारी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) इस्पितळाच्या बाहेर असलेले गाडे (Stall) आज पहाटेपासून हटविण्यास सुरुवात झाली होती . सरकारी जमिनीवर (Government Property) हे गाडे बांधले गेल्यामुळे ते हटवावेत अशी नोटीस तिसवाडीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT