Crocodile Attack Dog Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: व्हाळशी तळ्यातील मगरीने पाडला श्वानाचा फडशा

Bicholim News: वनखात्याने मगरीचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News: शहरातील व्हाळशी येथे भर लोकवस्तीजवळील नैसर्गिक तळ्यात संचार असलेल्या मगरीने तळ्याकाठी असलेल्या एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. ही घटना आज (मंगळवारी) दिवसाढवळ्या घडली.

भर लोकवस्तीतील श्री तळेश्वर देवस्थान परिसरातील तळ्यात संचार असलेल्या मगरीने भरदिवसा कुत्र्यावर हल्ला करुन त्याचा बळी घेतल्याने व्हाळशीतील जनता भयभीत झाली आहे. वनखात्याने या मगरीचा बंदोबस्त करावा. अशी मागणी व्हाळशीवासियांनी केली आहे. या घटनेनंतर प्राणीमित्र अमृतसिंग घटनास्थळी आले. मात्र मगर सापडू शकली नाही.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून व्हाळशीमधील तळ्यात एक मगर संचार करीत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. दुपारच्यावेळी ही मगर तळ्याकाठी विसावा घेतानाही अनेकांनी पाहिले आहे.

चाहूल लागताच ही मगर पाण्यात उडी घेत असे. या मगरीपासून कालपर्यंत कोणताच उपद्रव झाला नव्हता. मात्र आता या मगरीने कुत्र्यावर हल्ला केल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे.

तळ्याला टेकून असलेल्या देवस्थानच्या मांडवात लहान मुले खेळत बागडत असतात. शाळेत जाणारी लहान मुले तळ्याकाठी असलेल्या रस्त्यानेच ये-जा करतात. एखादेवेळी ही मगर लहान मुलांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, मगरीच्या संचाराबद्दल लोकांनी वन खात्याकडे संपर्क साधल्याचे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT