Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: उसगावात मूक-बधीर महिलेवर बलात्कार; तक्रारदार महिलेच्या नातेवाईकाला अटक

Ponda Police: संशयिताला न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांचा रिमांड बजावला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

उसगाव येथे एका मूक-बधीर महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात नोंद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या नातेवाईकालाच अटक केली आहे.

उसगावातील ही मूक-बधीर महिला साधारण पस्तिशीच्या आसपास असून संशयित आरोपी तिचा नातेवाईक असून तोही त्याच वयाचा आहे. तक्रारदार महिला फोंडा पोलिस स्थानकात आली. ही महिला मूक-बधीर असल्याने पोलिसांना तिचे हावभाव समजून घेणाऱ्या इसमाची मदत घ्यावी लागली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंद केली.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात तिच्यावर दोनवेळा बलात्कार झाला असून संशयित आरोपीने तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती महिला गप्प राहिली होती. मात्र, दुसऱ्यांदा बलात्कार केल्यानंतर या महिलेने थेट फोंडा पोलिस स्थानक गाठले. पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून संशयिताला अटक केली. संशयिताला न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांचा रिमांड बजावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT