New Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलावर पुन्हा सेल्फी घेण्याची संधी; उद्या 'या' वेळेपर्यंत पुल खुला ठेवणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; उद्या सायंकाळी 7 वाजता पुलाचे लोकार्पण

Akshay Nirmale

New Zuari Bridge: उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यांना जोडणाऱ्या नव्या झुआरी पुलाचे उद्घाटन उद्या, 29 डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याच्या पुर्वतयारीसाठी आज बुधवारी 28 डिसेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी हा पुल बंद करण्यात आला होता. पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा उद्या म्हणजेच 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 पर्यंत हा पुल सर्वसामान्य नागरीकांसाठी खुला ठेवणार असल्याचे सांगत लोकांना पुन्हा या पुलावर सेल्फीचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

नव्या झुआरी पुलाचे उद्घाटन उद्या सायंकाळी 7 वाजता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्री, महत्वाचे राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. 29 डिसेंबर या पुलाचे सौंदर्य, स्थापत्य पाहता यावे तसेच पुलावरून नदीचे सौंदर्य टिपता यावे यासाठी हा पुल सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुला ठेवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हजारो गोमंतकीयांना या पुलाला भेट दिली होती.

पुलाला भेट देणाऱ्या नागरीकांची संख्या इतकी मोठी होती की पणजी-मडगाव महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. त्याचा फटका अनेक वाहनधारकांना बसला होता. त्यामुळे या पुलावर सेल्फी घेण्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

त्यानंतर पुलाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी म्हणजेच आजच्या दिवशी पुल पुन्हा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आला होता. जेणेकरून उद्घाटन सोहळ्यासाठीची विविध तयारी करता येईल. पण त्यामुळे अनेकांना या पुलावर सेल्फी घेता आली नाही, किंवा हा पुल पाहता आला नाही, याची खंत वाटत होती. आता उद्घाटनाची तयारी झाली आहे. उद्या सायंकाळी 7 वाजता पुलाचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा सर्वसामान्य नागरीकांना 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 पर्यंत हा पुल पाहण्याची आणि येथे सेल्फी काढण्याची, फोटो काढण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT