colvale jail Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कोलवाळ कारागृहाच्या जेल अधिक्षकांना कैदी विकट भगतची धमकी; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Crime News: तुरुंग प्रशासनाने कैदी विकट भगत याचे कारागृहातील अंडर ट्रायल कैद्यांच्या विभाग २ मधून विभाग ४ मध्ये स्थलांतर करण्याचा आदेश जारी केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime: कोलवाळ कारागृह विभाग-२ चे फाटक अडवून तसेच तुरुंग अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना धमकी देत कर्तव्यात आडकाठी आणल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कैदी विकट भगत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ही घटना काल सायंकाळी ४.४५ च्या सुमारास घडली. तुरुंग अधीक्षक शंकर गावकर यांनी याप्रकरणी कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तुरुंग प्रशासनाने कैदी विकट भगत याचे कारागृहातील अंडर ट्रायल कैद्यांच्या विभाग २ मधून विभाग ४ मध्ये स्थलांतर करण्याचा आदेश जारी केला होता.

या आदेशानुसार तुरुंग अधीक्षक गेले असता कैदी विकट भगत याने इतर कैद्यांना बोलावून फाटक अडवले आणि अधीक्षक व कर्मचाऱ्यांना गंभीर परिणामांची धमकी दिली. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कैदी विकट भगत याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास कोलवाळ पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पिळगावकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Xi Jinping: जिनपिंग यांचे 'अध्यक्षपद' जाणार? विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वबदलाची चीनमध्ये रंगली चर्चा

Usgao: विनापरवाना बांधली भिंत, उसगावात वाढला पुराचा धोका; पंचायतीने बजावली नोटीस

Goa Live News Updates: त्या दोन मुली महाराष्ट्र-नाशिक येथे सापडल्या

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

SCROLL FOR NEXT