Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime News : वास्कोतील युवतीला तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा; महिलेविरुध्द गुन्हा नोंद

वास्को पोलिसांनी संशयित महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

Rajat Sawant

एका महिलेने युवतीला तब्बल अडीच लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार वास्को बायणा येथे घडला असून या प्रकरणी युवतीने वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली. सदर महिलेने वास्कोतील बऱ्याच लोकांना लाखो रुपयांना फसवले असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कार विकण्याच्या बहाण्याने फिर्यादीची 2 लाख 45 हजार 700 रुपयांची फसवणूक करणाऱ्या उमा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मायमोळे येथील संजना सुभाष मांद्रेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उमा पाटीलने 2015 साली कार विकत देऊ, असे सांगून मांद्रेकर यांच्याकडून 2,45,700 रुपये घेतले होते. मात्र, नंतर मांद्रेकर यांना कार आणि पैसेही न मिळाल्याने त्यांनी विचारणा केली असता, उमा पाटीलने त्यांना 'गंभीर परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी दिली आणि पैसे परत देण्यास नकार दिला.

सदर तक्रारीनुसार वास्को पोलिसांनी उमा पाटील हिचाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. सदर महिलेने वास्कोतील बऱ्याच लोकांना लाखो रुपयांना फसवले असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वास्को पोलिस उपनिरीक्षक मयूर सावंत अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT