Accident at Sankhalim  Dainik Gomantak
गोवा

Accident In Goa: दत्तवाडी साखळीत बुलेट आणि चारचाकीचा भीषण अपघात

Accident at Sankhalim: मोटारसायकल घेऊन निघालेल्या माणसाने समोरून येणाऱ्या कारगाडीला दिली धडक

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: दत्तवाडी साखळी इथे पुलावर काल कार आणि बुलेट मोटारसायकल यांचा भीषण अपघात झाला. टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.

सदर अपघात काल दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास झाला. i20 कार क्र. GA 03 AF 5638 हि सुर्ल येथून पडोसे येथे जात होती. तर GA 01 N 2733 हि बुलेट कारापूर येथून साखळीच्या दिशेने येत होती.

चारचाकी चालकाने दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार एका टेम्पोला ओव्हरटेक करत पुढे येत होता. चुकीच्या बाजूने आपली मोटारसायकल घेऊन निघालेल्या या माणसाने समोरून येणाऱ्या कारगाडीला धडक दिली.

दुचाकीवाला दारू पिऊन बुलेट चालवत होता. बुलेट चालकाच्या डोक्याला हेल्मेट नसल्यामुळे त्याच्या डोक्याला मार बसला. चारचाकी चालकाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित पोलिसांना फोन केला तर स्थानिकांकरवी जखमी बुलेट चालकाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या अपघातामुळे साखळी भागातील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT