Old House Demolition At Calangute Dainik Gomantak
गोवा

Calangute Panchayat: दोनशे वर्षे जुन्या धोकादायक बांधकामावर बुलडोझर; पंचायतीची कारवाई

Goa Old House Demolition: पाडण्यात आलेल्या जीर्ण बांधकामाचा स्थानिक लोकांबरोबरच पर्यटकांच्याही जीवाला धोका होता

गोमन्तक डिजिटल टीम

टिटो - कळंगुट (तीन रस्ता) येथे मध्यवर्ती असलेले जुने पडीक व जीर्ण बांधकाम अखेर शुक्रवारी स्थानिक पंचायतीकडून पाडण्यात आले. सुमारे दोनशे वर्षे जुन्या असलेल्या येथील पडक्या बांधकामामुळे स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

यावेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो, स्थानिक सरपंच जोजफ सिक्वेरा पंचायत मंडळाचे इतर सदस्य, पंचायत सचिव तसेच स्थानिक श्रीदेव बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर, कळंगुट भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुरुदास शिरोडकर उपस्थित होते.

यंदा राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कळंगुटमध्ये अनेक झाडे तसेच पडकी घरे जमीनदोस्त झाली होती. शुक्रवारी पाडण्यात आलेल्या जीर्ण बांधकामाचा स्थानिक लोकांबरोबरच पर्यटकांच्याही जीवाला धोका होता. तसेच परिसरात भटकणारे तसेच घरदार नसलेले अनाथ लोक रात्रीच्या वेळी या पडक्या बांधकामाच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी झोपत होते. त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका होता.

यासंदर्भात उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आला होता अशी माहिती यावेळी आमदार मायकल लोबो यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येथील पडक्या बांधकामाची दखल घेत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आल्याने शुक्रवारी दुपारी स्थानिक पंचायत तसेच बुलडोझर आदी यंत्रांच्या मदतीने सदर बांधकाम पाडून टाकण्यात आल्याचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी सांगितले तसेच यापुढे परिसरातील पडक्या बांधकामांवर पंचायत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT