Calangute Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Calangute Dengue Cases: कळंगुट किनारी भागात डेंग्युचे 94 रूग्ण; पंचायतीकडून मोफत औषधवाटप

खोब्रावाडो, नाईकवाड्डो येथे प्रत्येकी 19 रूग्ण

Akshay Nirmale

Calangute Dengue Cases: कळंगुट पंचायतीने एक सप्टेंबरपासून पंचायत सभागृहात मोफत डेंग्यू चाचणी उपक्रम सुरू केला होता. त्यानंतरपासून येथे 94 रुग्णांची डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकाच महिन्यातील हा आकडा असून डेंग्यु बाधितांच्या वाढत्या संख्येने कळंगुट किनारपट्टी भागात डेंग्युने दहशत निर्माण केली आहे.

दरम्यान, गणेशोत्सवामुळे तात्पुरती थांबलेली मोफत चाचणी सोमवारपासून पुन्हा सुरू होईल, असे कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.

सिक्वेरा म्हणाले की, “डेंग्यू चाचणी केलेल्या 397 व्यक्तींपैकी 94 जण पॉझिटिव्ह आढळले. गावात अचानक डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने आम्ही चाचणी युद्धपातळीवर घेण्याचे ठरवले. आम्ही पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत औषधे देखील देत आहोत.

खोब्रावाड्डो आणि नायकवाड्डो येथे प्रत्येकी 19 पॉझिटिव्ह प्रकरणे आढळून आली असून त्यानंतर गौरववाड्डो (पश्चिम) येथे 11 आणि उमटवाड्डो 10 रूग्ण आढळून आले आहेत. पंचायतीने चाचण्या घेत असलेल्या सर्व रुग्णांचा डेटा राखून ठेवला आहे.

आम्ही डेटा कोणाशीही शेअर केलेला नाही किंवा आरोग्य अधिकार्‍यांनी आम्हाला डेटा मागितला नाही, असेही सरपंच सिक्वेरा यांनी सांगितले.

डेंग्यूचे विषाणू नष्ट करण्यासाठी पंचायतीने डेंग्यू-प्रतिबंधात्मक उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी एक लाख रुपयांची कीटकनाशके खरेदी केली असून, सर्व वॉर्डांमध्ये फवारणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT