Vote  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: सत्तरीत 90.69 टक्के मतदान!

94 प्रभागांतून 276 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

दैनिक गोमन्तक

वाळपई: सत्तरी तालुक्यातील बारा पंचायतींसाठी एकूण 90.69 टक्के मतदान तर 94 प्रभागांतून 276 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले. एकूण 83 मतदानकेंद्रांवर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. आता लक्ष शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्‍या मतदानाला हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत गेला. कोपार्डे-सत्तरी येथील सर्वांत वृद्ध महिला द्रौपदी सगुण सावंत यांनीही मतदान केले.

(90.69 percent polling in sattari for goa panchayat election)

दुपारी बारा वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. पावसाने विश्रांती घेतल्‍याने मतदारांचा उत्‍साह दिसून आला. संध्याकाळच्या सत्रात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मतदान 90.69 टक्‍क्‍यांवर पोचले, अशी माहिती निवडणूक अधिकारी कौशिक देसाई यांनी दिली.

अन्‌ पैकुळवासीयांनी केले मतदान

पैकुळ-सत्तरी पूल पावसामुळे वाहून गेल्‍यानंतर तेथील बंधाऱ्यावर साकव बांधून नागरिकांची तात्‍पुरती सोय करण्‍यात आली होती. त्‍यामुळे तेथील ग्रामस्‍थांनी मतदानावर बहिष्कार घालण्‍याचे ठरविले होते. पण गावात यंदा प्रथमच मतदारकेंद्र उभारल्यानंतर पैकुळ गावातील नागरिकांनी मतदान केले. याबाबत तेथील उमेदवार संतोषी नाईक म्हणाल्या की, यंदा गावात मतदानकेंद्र सुरू केल्यानंतर गावातील नागरिकांची चांगली सोय झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT