Smart City Panaji Dainik Gomantak
गोवा

Smart City Panaji: स्मार्ट सिटीची 90 टक्के कामे झाल्याचा दावा; तरी पावसाळ्यात पणजी तुंबणार

Smart City Panaji: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांच्या मुदतीला एक दिवस बाकी उरला आहे.

Pramod Yadav

Smart City Panaji

यंदाच्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने राजधानीत पुन्हा पूरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी कबुली पणजीचे आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीची कामे ९० टक्के झाल्याचा दावाही त्यांनी केला.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांच्या मुदतीला एक दिवस बाकी उरला आहे. ३१ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला आणि सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दिले होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अधिकाऱ्यांसह मळा ते काकुलो जंक्शन पाहणी केली.

पाण्याचा सामना करण्यास सज्ज रहावे

पणजीकरांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात आणि त्यांचे राहणीमान उंचावे यासाठी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत, परंतु ही कामे दिलेल्या मुदतीनुसार ३१ मे पर्यंत पूर्ण होणार का? हा सवाल होता आणि त्याचे उत्तर मंत्री बाबूश यांनी देऊनही टाकले.

स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यानंतर जी कामे झालेली आहेत, त्यातून पणजीत पावसाळ्यात पाणी तुंबणार काय? अशीच शंका सर्वांना सतावत आहे. त्यावरही बाबूश यांनी शक्यता नाकारली नसल्याने पणजीकरांनी तुंबणाऱ्या पाण्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे, असेच एकप्रकारे सूचित केले आहे.

कामाचा दर्जा; ठेकेदारावर ठपका

आमदार म्हणून मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करून ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचे आणि काही ठिकाणी मॅनहोलचे, तर पदपथांचे काम बाकी राहिल्याचे सांगितले. त्याशिवाय कामाच्या दर्जाबाबत मात्र त्यांनी कंत्राटदारावर ठपका ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Varca Panchayat Construction Permit: हायकोर्टाच्या निर्देशांनाच हरताळ; बांधकाम परवान्यात स्वतःच्या अटी लादल्याने वार्का पंचायत सचिवाला कडक ताकीद

Online Payment: ऐन गणेश चतुर्थीत गॅससाठी 'रोखी'ची सक्ती; Google Pay बंद, ऑनलाइन पेमेंट करता न आल्याने ग्राहकांची मोठी परवड

US Tariff Controversy: 'भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड नाही!', अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफच्या धमक्यांना भारताचं सडेतोड उत्तर; 140 कोटी जनतेचा प्रश्न

खरी कुजबुज: चोरी की विसर्जन?

Dabolim Airport: दाबोळीला उतरती कळा, 'मोपा'ची भरारी! प्रवासी संख्येत 34 टक्क्यांची वाढ; जुन्या विमानतळावर मात्र 13 टक्क्यांची घट

SCROLL FOR NEXT