Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: नाबार्ड देणार 8995 कोटींचे कर्ज

Goa Government: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे मंगळवारी आयोजित राज्य कर्ज परिसंवादात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी गोव्याच्या प्राधान्य क्षेत्रात रू. 8995 कोटींच्या कर्जाचा अंदाज केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे मंगळवारी आयोजित राज्य कर्ज परिसंवादात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी गोव्याच्या प्राधान्य क्षेत्रात रू. 8995 कोटींच्या कर्जाचा अंदाज केला आहे. हा अंदाज त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 26.69 टक्के एवढा अधिक आहे.

एकूण अंदाजित कर्ज क्षमतेपैकी रू. 1860 कोटी एवढी रक्कम (20.68 टक्के) कृषी आणि संबंधित उपक्रमांसाठी आहे. पुढे रू. 6097 कोटी एवढी (67.89 टक्के) कर्ज क्षमता ही एमएसई क्षेत्रासाठी अंदाजित करण्यात आली आहे. तर अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी रू. 1037.52कोटींचा (11.53) अंदाज करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या परिसंवादास प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राज्य फोकस पेपरचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी वित्त सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, आरबीआयचे क्षेत्रीय सं. संचालक प्रभाकर झा, नाबार्डचे गोवा सरव्यवस्थापक डॉ. मिलिंद भिरूड, एसएलबीचे सरव्यवस्थापक राम सिंग आदि उपस्थित होते.

राज्य फोकस पेपरा राज्य कर्ज योजना तयार करण्यासाठी जिल्हा पातळीवर संभाव्य कर्ज क्षमतेचे एकत्रीकरण करून तयार केलेला दस्तावेज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT