robbery incident  Dainik Gomantak
गोवा

Dabolim airport : टॅक्सीवाला असल्याचे भासवत पर्यटकांना 8.70 लाखांना गंडा; बोलण्यात गुंतवत ऐवज लांबवला

दैनिक गोमंतक

वास्को: गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या दोन पर्यटक कुटुंबियांना दाबोळी विमानतळावर चोरट्यांनी लुटल्याची घटना काल ( दिनांक 11 डिसेंबर रोजी ) रात्री उशिरा घडली. यात पर्यटकांचे रोख रक्कम व इतर सामान मिळून 8 लाख 70 हजार रुपयांच्या मुद्देमाल लांबवला आहे. चोरट्यांनी पर्यटकांना बोलण्यात गुंतवत मुद्देमाल लांबवला असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

(8.70 lakh stolenof jewellery stolen from tourists at Dabolim airport)

दाबोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेश येथील बी. एन. शाह अली नामक पर्यटक व श्रीनगर येथील सज्जात अहमद भट हा पर्यटक आपल्या कुटूंबासह विमानाने दाबोळी विमानतळावर पोचला. दोन्ही कुटुंबांनी दाबोळी विमानतळावरील आगमन गेट-1 च्या बाहेर आल्यानंतर टॅक्सीवाले असल्याचे भासवून चोरट्यांनी गाडी भाड्याविषयी चर्चा केली. व बोलत असताना चोरट्यांनी पर्यटकांचे साहित्य ट्रॉलिवरील बॅग घेत पलायन केले.

थोड्याच वेळात पर्यटक शाह यांना आपली ट्रॉलीवरील बॅग गायब झाल्याची लक्षात आले. ज्यात 70 हजार रुपये रोख व 7 ला रुपयांचे सोन्याचे ऐवज, दोन मोबाईल, पेटीएम कार्ड आणि इतर वस्तू होत्या. यानंतर हा प्रकार दुसऱ्या पर्यटकाच्या बाबतीत घडल्याचीही पोलिस स्थानकात तक्रार नोंद झाली आहे. त्यांनाही चोरट्यांनी टॅक्सीवाला असल्याचे भासवत चर्चा करायला सुरुवात केली. व ट्रॉलीतील बॅग काढून पोबारा केला.

पोबारा केल्यानंतर काही वेळानंतर पर्यटक सज्जात अहमद यांनाही आपल्याला लुटले गेल्याची जाणीव झाली. सज्जात यांच्या बॅगमध्ये 1 लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याची अंगठी, डेबीट कार्ड आणि इतर सामग्री होती. तेही कुटुंबियासह दाबोळी विमानतळावर उतरले होते. दोन्ही पर्यटकांचे मिळून 8 लाख 70 हजारांहून अधिक मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला.

दरम्यान या प्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंस 379 कलमाखाली गुन्हा नोंद केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विनायक पाटील यांनी दिली. पोलिस विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT