Pernem Police News: मोरजी पोस्ट ऑफिसची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी सिंधुदुर्गातील एकास अटक केली आहे. या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी म्हापसा उपविभागाचे पोस्ट इन्स्पेक्टर यांनी तक्रार दिली होती. त्यावरून नारायण चंद्रकांत भागे याला अटक करण्यात आली आहे.
तो मूळचा तळवणे (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मोरजी येथे आऊटसायडर ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत होता.
त्याने विविध ठेवीदार/सार्वजनिक सदस्यांकडून रोख रक्कम स्वीकारली होती. ही रक्कम सुमारे 8 लाख 37 हजार 050 रूपये इतकी होती. ती त्याने संबंधित खात्यांमध्ये जमा केली नव्हती. तसेच त्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेडणे पोलिसांनी विविध तांत्रिक मदत घेत विविध पथके तयार करून संशयित आरोपीचा माग काढला. आणि 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र-गोवा सीमा तपासणी नाक्यावर त्याला पकडले.
या मोहिमेचे नेतृत्व पीएसआय नवनीत गोलतेकर यांनी केले. तर प्रेमनाथ सावलदेसाई, पोलिस कॉन्स्टेबल प्रज्योत मयेकर, सागर खोर्जुवेकर, सिंद्धात म्हामल, यांचाही पथकात समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.