libraries Gomantak Digital Team
गोवा

Libraries In Goa: राज्यात अद्ययावत ७८ वाचनालये..! वाचनालय धोरण राबविणारे पहिले राज्य

गोमन्तक डिजिटल टीम

वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्य सरकार तसेच कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे विशेष प्रयत्न करत असून राज्यात नवीन अद्ययावत ७८ ग्रामीण वाचनालये उभारण्यात येणार असल्याचे कृष्णदास शामा मध्यवर्ती वाचनालयाचे क्युरेटर डॉ. सुशांत तांडेल यांनी सांगितले.

डॉ. तांडेल म्हणाले, केंद्र सरकारकडून वाचनालयांसाठी ७४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातील ७८ वाचनालयाच्या बांधकाम, संगणक व इतर अद्ययावत सुविधांसाठी प्रत्येकी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

तसेच ७६ जुनी ग्रामीण वाचनालये आहेत, ज्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येतील. यासंबंधी सर्वेक्षण करून अहवाल सरकारला सादर करून सरकारने स्वीकृत करून हे काम माहिती आणि तंत्रज्ञान खात्याला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

४० हजार दुर्मिळ पुस्तके!

कृष्णदास शामा ग्रंथालयात पोर्तुगिजकालीन तसेच पोर्तुगिजपूर्व काळातील सुमारे ४० हजार दुर्मिळ पुस्तके आहेत. त्यांच्या डिजिटायजेशनचे सुरू असून आत्तापर्यंत सुमारे ३ लाख पाने डिजिटल करण्यात आली असून येत्या काळात हे काम पूर्ण होणार असल्याचे डॉ. तांडेल यांनी सांगितले.

...पहिलेच राज्य!

गोवा सरकारने वाचन संस्कृती वृद्धीसाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे राज्य सरकार वाचनालय धोरण अमलात आणणार आहे. हे धोरण राबविणारे पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणामुळे वाचनसंस्कृती वृद्धीसाठी होणार असल्याचे मत कृष्णदास शामा ग्रंथालयाचे क्युरेटर डॉ. तांडेल यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जुलूसवर कायमच्या बंदीची मागणी; गोव्यात हिंदू संघटनेच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक, म्हापशात तणाव

आमच्यासाठी 'शेतकरी' महत्त्वाचे आहेत! कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहात आमदार फळदेसाईंचे प्रतिपादन

Goa Crime: विद्यार्थ्यांच्या भांडणात तिसरीतली विद्यार्थीनी गंभीर जखमी, अत्यवस्थ होऊनही शाळेचे दुर्लक्ष; पालक संतप्त

Sunburn Festival 2024: ‘आमका नाका सनबर्न’! गावपण टिकवण्यासाठी कामुर्लीत स्थानिक एकवटले

Bollywood Actress Alia Bhatt: हसमुख आलियाचा हॉट अंदाज चाहत्यांना मोहीनी घालतोय!

SCROLL FOR NEXT