RTO License Cancelled Canva
गोवा

Goa Traffic Police: वाहतूक पोलिसांची कडक कारवाई! 10 महिन्यांत 'इतके' परवाने निलंबित; नूतनीकरणासाठी प्रशिक्षण होणार सक्तीचे

Goa Traffic Police Department: दहा महिन्यात वाहतूक पोलिस खात्याने मोटार वाहन नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई करून ३२,५३६ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्याकडे शिफारस केली होती. त्यापैकी आतापर्यंत ७५३६ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police Department Cancelled 7536 Licenses

पणजी: दहा महिन्यात वाहतूक पोलिस खात्याने मोटार वाहन नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई करून ३२,५३६ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्याकडे शिफारस केली होती. त्यापैकी आतापर्यंत ७५३६ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

निलंबित झालेले परवान्यांचे नूतनीकरणासाठी संबंधित व्यक्तीला आरटीओ व वाहतूक पोलिस कार्यालयात नियमासंदर्भात प्रशिक्षण सक्तीचे आहे. ते पूर्ण केल्यानंतरच त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाते, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

गृहरक्षकांची मदत

या महिन्यात किनारपट्टी परिसरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह गृहरक्षक व काही स्वयंसवेकांचीही मदत घेण्यात येणार आहे. गरज पडल्यास गोवा सशस्त्र दलाचे पोलिसही घेण्यात येतील. यावेळी सेंट फ्रांसिस झेवियर शवप्रदर्शन सोहळा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने दरवर्षीपेक्षा अधिक पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT