75 patients die due to lack of oxygen in Goa Medical College Hospital
75 patients die due to lack of oxygen in Goa Medical College Hospital 
गोवा

काळोखाचे तास: 'गोमॅको'त ऑक्सिजन अभावी 75 रूग्णांचा बळी

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: उच्च न्यायालयाच्या(High Court of Bombay in Goa) हस्तक्षेपानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय(oa Medical College and Hospita) इस्पितळामध्ये रात्री 2 ते पहाटे 6 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त(Covid-19) रुग्णांच्या मृत्यूंचे सत्र सुरूच असून काल रात्री 13 जणांचा ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी मृत्यू(Death) झाला. ऑक्सिजन(Oxygen) पुरवठ्यात सुरू असलेल्या या गैरव्यवस्थापनाचा घोळ अजूनही संपुष्टात आणण्यास सरकारला यश आलेले नाही हे या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. आज 61रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची आकडेवारी दोन हजाराच्या आसपास 1998 वर पोचली आहे.(75 patients die due to lack of oxygen in Goa Medical College Hospital)

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी होत असलेल्या कामांच्या कार्यवाहीचा सादर केलेला अहवाल समाधानकारक असल्याने जनहित याचिकांवरील सुनावणी येत्या सोमवारी 17 मे रोजी होणार आहे. गोव्यात काल शुक्रवारी आणखी 13 रूग्णांच्या मृत्यू झाल्याने आता हा आकडा 75 वर पोहचला आहे. शुक्रवारी 13 गुरुवारी, 15, बुधवारी 21 आणि मंगळवारी 26 लोकांचा ऑक्सिजन अभावी बळी गेला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल सुनावणीवेळी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जी कामे सुरू आहेत त्याच्या कार्यवाहीचा अहवाल काल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत देण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्य सचिव रवी धवन यांनी तो सादर केला. या अहवालात तज्ज्ञ ट्रक्टरचालक, द्रव्य वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) टाकी, रुग्णवाहिका व शववाहिका भाडेदरावर निर्बंध, रिकाम्या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठीची व्यवस्था, डुरा सिलिंडरची उपलब्धता, ऑक्सिजन ट्रॉली व सिलिंडरच्या पुरवठ्याबाबतची स्थिती, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स तसेच केंद्राकडून एलएमओची अतिरिक्त मागणी यासंदर्भातची माहिती दिली आहे. 

सरकारने नव्याने 8 तज्ज्ञ ट्रॅक्टरचालकांची कोल्हापूर येथून व्यवस्था केली आहे. पाच चालक आज दुपारी आले असून ते कामाला लागले आहेत, तर दोघेजण आज संध्याकाळी उशिरापर्यंत पोहचणार आहेत. हे चालक खोर्ली येथून ऑक्सिजन सिलिंडरची ट्रॉली चालवून गोमेकॉ इस्पितळापर्यंत आणण्याचे काम करणार आहेत. सुपरस्पेशॅलिटी इस्पितळाबाहेर उभारण्यात येत असलेली एलएमओ टाकीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही टाकी बसविण्यात आली आहे. मात्र, त्याला जोडणारी पाईपलाईन याचे काम सुरक्षितपणे करण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम 16 मे पर्यंत पूर्ण करून 17 रोजी सकाळी त्यातून ऑक्सिजन पुरवठा सुरू केला जाणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT