Theft  Dainik Gomantak
गोवा

नवी पिढी गुन्हेगारीच्या वाटेवर; 7 वर्षीय मुलाने केली पेट शॉपमध्ये चोरी

ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: वास्को येथे एका पेट शॉपच्या कॅश काउंटरमधून काल दुपारी दोन महिलांनी एका 7 वर्षाच्या चिमुकलीच्या मदतीने रोकड लुटली. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(7-year-old captured stealing cash from pet shop counter at Vasco)

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानाच्या कॅश काउंटरमधून पैसे घेताना दोन महिला बालकासह दुकानात आल्या होत्या. पोलीस या दोन महिलांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर चोरट्यांचा सुळसुळाट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून विविध समुद्रकिनाऱ्यांवर त्याची गर्दी आहे. समुद्रात स्नान करण्यासाठी जाताना किनाऱ्यावर ठेवलेले कपडे व वस्तू चोरण्याचे प्रकार सर्रास घडत असून त्याच्या तक्रारीही पोलिस स्थानकात दाखल होत आहेत. किनाऱ्यावर नियुक्त करण्यात आलेल्या पर्यटन पोलिसांची नजर व दक्षता नसल्याने चोरट्यांचे आयतेच फावले आहे. जिवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मात्र त्यांच्या किंमती वस्तूंना मुकावे लागल्याने पस्तावण्याची पाळी येत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात.

समुद्रकिनाऱ्यावर फेरीवाले तसेच मसाज करणाऱ्या परप्रांतीय महिलांना बंदी असूनही ते सर्रासपणे हा व्यवसाय करताना दिसतात. फिरते विक्रेतेही पर्यटकांना वस्तू खरेदी करण्यासाठी सतावणूक करतात. गोव्यात आलेले पर्यटक किनारा पाहून बेभान होऊन स्नानासाठी समुद्रात उतरतात. त्यांच्या बॅगा तसेच कपडे किनाऱ्यावर ठेवून ते पाण्यात जातात. किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने समुद्रात उतरलेल्यांची नजर चुकवून बॅगा, पळवण्याचे प्रकार घडत आहेत. काळोख होईपर्यंतही काही पर्यटक समुद्रातच मजा घेत असतात त्यामुळे अंधाराचा फायदा घेत हे चोरटे वस्तू हातोहात लंपास होण्याच्या घटना बागा, वागातोर व कळंगुट किनाऱ्यावर घडल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT