illegal meat transport Dainik Gomantak
गोवा

Beef Smuggling: "कागदपत्रं दाखवल्याशिवाय कंटेनर सोडणार नाही"; मोले चेकपोस्टवर केसरिया हिंदू वाहिनीने पकडले 7 टन गोमांस

Mollem checkpost news: केसरिया हिंदू वाहिनी गोवंश संरक्षण कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा आणि त्यांच्या पथकाने मोले तपासणी नाक्यावर उत्तर प्रदेश नोंदणीकृत कंटेनर ट्रक रोखला

Akshata Chhatre

मोले: केसरिया हिंदू वाहिनी गोवंश संरक्षण कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा आणि त्यांच्या पथकाने मोले तपासणी नाक्यावर उत्तर प्रदेश नोंदणीकृत कंटेनर ट्रक रोखला. या ट्रकमध्ये सुमारे ७ टन मांस भरलेले होते आणि हे मांस गोमांस असल्याचा संशय जीव झा यांनी व्यक्त केलाय. या घटनेनंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या मांसाची कागदपत्रे तपासण्याची आणि ते गोमांस आहे का, याची चाचणी करण्याची मागणी केली आहे.

राजीव झा यांनी दिलेल्या माहितीनुसार गोमांसाने भरलेला हा कंटेनर उत्तर प्रदेशमधील नोंदणीकृत वाहन आहे, मात्र उत्तर प्रदेशात गोमांसावर बंदी आहे. कंटेनर चालकांनी त्यांना दिलेल्या माहितीनुसार हा कंटेनर महाराष्ट्रातील औरंगाबादमधून आलेला आहे, पण राजीव झा यांच्यामते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गाईला गोमातेच्या दर्जा दिलेला असल्याने अशा परिस्थितीत जर का औरंगाबाद, महाराष्ट्रातून गोमांसाची तस्करी होणार असेल तर याबद्दलची संबंधित कागदपत्रे तपासून पाहावीत अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांजवळ केली आहे.

पोलिसांकडून तपशिलांमध्ये फेरबदल केले जाऊ नयेत म्हणून सोशल मीडियावर लाईव्ह येऊन याबद्दलची माहिती उघड केल्याचं त्यांनी सांगितलंय आणि या सोयाबीतच जोपर्यंत या वाहनाची आणि इतर महत्वाची कागपत्रे हाती लागत नाहीत तोपर्यंत ही गाडी सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

सध्या गोव्यात विविध याठिकाणी गोमांसाची तस्करी होत असल्याचे अनेक प्रसंग समोर येत आहेत. यापूर्वी देखील रेल्वेमधून गोमांसाची होत असलेली तस्करी उघडकीस आणून गोवा पोलिस पथक गोव्यात परतले होते. दिल्लीतून गोव्यात अनेकदा बीफ पुरवठा केला जात असून तेथील बीफ माफियांचा या तस्करीला वरदहस्त असल्याचे आढळून आले आहे. लवकरच या सर्व बाबींचा पर्दाफाश होण्याची पोलिसांना आशा आहे. दिल्लीला गेलेल्या या पथकाने तेथील रेल्वे पार्सल कार्यालयाचे कमिशनर, अधीक्षक यांचीही जबानी नोंद करून घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT