Russia Ukraine War Dainik Gomantak
गोवा

युक्रेनमधून आतापर्यंत 7 विद्यार्थी गोव्यात दाखल

सहा गोमंतकीय विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडले; सहाजणांची सीमेकडे कूच

दैनिक गोमन्तक

पणजी : रशिया आणि युक्रेन यांच्यातील धुमश्चक्रीत गोवा राज्यातील अडकलेल्या 19 विद्यार्थ्यांपैकी सातजण सुखरूप गोव्यात दाखल झाले आहेत. सहा विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडून इतर देशांच्या आसरा घेतला आहे, तर अन्य सहा विद्यार्थी सीमेकडे निघाल्याची माहिती गोव्याच्या अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे. (Russia Ukraine War News Updates)

गोव्यातून (Goa) शिक्षणासाठी 19 विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले होते. सध्या युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने भारतीयांनी युक्रेन सोडण्याची सूचना भारतीय दूतावासाने दिली आहे. त्यानुसार 7 गोमंतकीय विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतात आणले असून ते गोव्यात दाखल झाले आहेत. दोन विद्यार्थी रोमानियामध्ये असून तीन विद्यार्थी हंगेरीमध्ये पोचले आहेत. एक विद्यार्थी पोलंडमध्ये पोहोचला आहे.

दोन गोमंतकीय विद्यार्थी (Student) खार्किवमध्ये तर एक विद्यार्थी सुमीमध्ये अडकला होता. हे तिघेही सीमेकडे निघाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याशिवाय तीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या संस्था सोडल्या असून तेही युक्रेन (Ukraine) सोडण्यासाठी सीमेकडे निघाले आहेत. मात्र, त्यांचे निश्चित ठिकाण समजत नसल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT