Driver arrested for accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Tivim New: माडेल थिवी येथे 64 हजारांची चोरी; दोघांना अटक

मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान मोडत चोरट्यांनी लांबवले होते साहित्य

दैनिक गोमन्तक

माडेल - थिवी येथे मोबाईल विक्री व दुरुस्ती दुकानात चोरी झाली होती. यात चोरट्यांनी दुकान फोडून 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबला होता. या प्रकरणातील चोरी प्रकरणी अभिषेक कुमार सिंग, (23, रा. बिहार ) व कल्याण कमल हॅण्डीकी (26) , रा. आसामा या दोघा संशयितांना कोलवाळ पोलीसांना अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणात तपास वेगाने करत ही चोरीची घटना मागील बुधवारी दि. 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. 4 रोजी याबाबत सकाळी दुकान फोडल्याचे दुकान मालक सूर्यकांत कामत (तोरसे) यांनी पोलिसात तक्रार दाखल दिली होती . यानंतर तपास वेगाने करत आज संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या चोरट्यांनी दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे दोन नवीन व पाच जुने मोबाईल मिळून 63 हजारांचे सात मोबाईल फोन आणि दीड हजार रुपये रोकड मिळून एकूण 64 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरला होता. या सर्व चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी संशयितांकडून ताब्यात घेतला आहे.

Goa Congress : काँग्रेसच्या ‘त्या’ 10 आमदारांना तुर्तास दिलासा

तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या दहा आमदारांनी पक्ष विलीन झाल्यासंदर्भात बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा अर्ज म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने फेटाळला. ठराव तयार करण्यासाठी पक्ष समितीचे लेटरहेड व शिक्का यांचा वापर केला म्हणून बनवेगिरीचा गुन्हा केला, असे म्हणता येत नाही. यामधून दखलपात्र गुन्हा सिद्ध होत नाही. त्यामुळे अशा तक्रारीत गुन्हा दाखल करता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी 20 एप्रिल 2021 रोजी पणजी पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत 10 काँग्रेसच्या आमदारांनी बनवेगिरीने पक्षाचे लेटरहेड तसेच शिक्क्याचा वापर करून 10 जुलै 2019 रोजी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाल्याचा खोटा ठराव तयार केला. हा ठराव खोटा असून त्यासाठी वापरलेले लेटरहेड व शिक्का अधिकृत नाही. त्यांनी सभापतींसमोर दाखल केलेला ठराव ही बनवेगिरी आहे.

याप्रकरणी सभापतींसमोर आमदार अपात्रता याचिका सादर केली आहे. त्यामध्येही त्या आमदारांनी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे नमूद केले आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी तक्रारच नोंदवलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने ही तक्रार दाखल करून घेऊन आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती चोडणकर यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT