Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

केवळ तिजोरी भरण्यासाठी गोवा सरकारचा खटाटोप

पंचायत मंत्र्यांची माहिती : हजारोंना घरक्रमांक देण्याचा मार्ग आता मोकळा, प्रक्रिया सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील हजारो अनधिकृत घरांना (Unauthorized Houses) घर क्रमांक देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंचायत क्षेत्रात येणाऱ्या कुठल्याही अनधिकृत घर, इमारत अथवा बांधकामाला आता कर आकारून त्यांना घर क्रमांक मिळणार आहे. सरकारने आज तसे एक परिपत्रक काढले. हे शक्य होण्यासाठी गेल्या विधानसभा अधिवेशनात पंचायत राज कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. गोव्यातील 50 ते 60 टक्के घरे अनधिकृत असल्याची माहिती पंचायत मंत्री माविन गुदीन्हो(Mavin Gudinho) यांनी दिली होती.

ही कायदेशीर प्रक्रिया केवळ कर आकारणीसाठी : राज्यातील या अनधिकृत घरांना विविध मूलभूत सुविधा पोहचविण्यासाठी पंचायतीवर आर्थिक ताण येत होता. पंचायतींना आर्थिक पाठबळ मिळावे, हा या मागचा हेतू असल्याचे सरकारचे म्हणने आहे. घर क्रमांक दिल्यामुळे ही बांधकामे अधिकृत होणार नाहीत आणि अशा घरांवर कायदेशीर कारवाई करण्यास कुठल्याही अधिकाऱ्यांना मनाई असणार नाही, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र ही कायदेशीर प्रक्रिया केवळ कर आकारणीसाठीच सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

शुल्क आकारणी अशी

ग्राम पंचायतीना अशा अनधिकृत घरांच्या वेगळा रजिस्टर ठेवावा लागेल. अस्थायी घर क्रमांक देताना या घर क्रमांकांना पुढे ‘इएचएन’ अशी अक्षरे लावण्यात येतील, तसेच अशा घरांना घर क्रमांक मिळवण्यासाठी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन शुल्क द्यावे लागेल जे कॉक्रीटच्या घरांसाठी दोन हजार रुपये, कौलारू घरांसाठी एक हजार रुपये आणि झोपडींसाठी 500 रुपये असतील.

या तरतुदीचा गैरवापर टाळण्यासाठी पंचायत सचिव, सरपंच, पंच यांना शिक्षित करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पंचायतींकडून केवळ क्रमांक नसलेली घरांचा विचार केला जाईल. अनधिकृत घराला घर क्रमांक देण्यापूर्वी, पंचायतीद्वारे छायाचित्र आणि स्थानाचा तपशील जसे सर्वेक्षण क्रमांक आणि इतर तपशील जोडले जातील, असे गुदिन्हो म्हणाले. या प्रावधानचा दुरूपयोग होवू नये म्हणून आवश्यक उपाय योजना केली असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT