Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Fraud Case: पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने 58.50 लाखांना घातला गंडा!

Fraud Case: पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने अस्नोडा येथील सुकडो नास्नोळकर यांची 58.50 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दैनिक गोमन्तक

Fraud Case: पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने अस्नोडा येथील सुकडो नास्नोळकर यांची 58.50 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित विजय विनायक रेडकर व रिया आचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, ही फसवणुकीची घटना २०१६ ते २०२३ या कालावधीत घडली. फिर्यादी सुकडो नास्नोळकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी फिर्यादीचा विश्‍‍वास संपादन केला. तसेच एका कंपनीची पैसे दुप्पट करण्याची योजना असल्‍याचे पटवून दिले.

आपले पैसे मिळण्‍याची शक्‍यता कमी असल्‍याचे दिसताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेऊन संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंसंच्या ४२०, ५०६ (२) व ३४ कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरात हे करत आहेत.

भाडेकरू म्‍हणून आले, ‘टोपी’ घालून गेले!

संशयितांच्या आमिषाला बळी पडून सुकडो नास्नोळकर यांनी ५८.५० लाख रुपयांची रक्कम कंपनीत गुंतवण्यासाठी दिली. पण आतापर्यंत दुप्पट सोडाच, गुंतवलेली रक्कमही परत मिळाली नाही.

त्‍यामुळे नास्नोळकर यांनी आपल्‍या पैशांची मागणी केली, परंतु संशयितांनी ते देण्‍यास नकार दिला. तसेच याबाबत कुणाकडे खुलासा केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. संशयित हे फिर्यादीकडे भाड्याच्या खोलीत राहायचे. त्‍याच ओळखीचा फायदा घेत त्‍यांनी नास्नोळकर यांचा विश्‍‍वास संपादन केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: हणजूण ग्रामसभा तापली; संगीत महोत्सवावरुन दोन गटात मारहाण

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Goa Tourism: पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार; गोवा-उझबेकिस्तान संबंधांना मिळणार नवा आयाम!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT