IFFI Goa Registration Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: कंटेट क्रिएटर्ससाठी खुशखबर, इफ्फी'संदर्भात PIB ची महत्त्वाची घोषणा

IFFI Goa Registration: ईफ्फीच्या संपूर्ण कालखंडात पहिल्यांदाच डिजिटल कंटेट क्रिएटर्सना या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे

Akshata Chhatre

55th IFFI Digital Content Creators Registration

पणजी: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक मोठा सोहळा म्हणजेच, ईफ्फीचे यंदा 55वे वर्ष आहे आणि खास बाब म्हणजे ईफ्फीच्या संपूर्ण कालखंडात पहिल्यांदाच डिजिटल कंटेट क्रिएटर्सना या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डिजिटल क्रिएटर्स देखील स्वतंत्रपणे भाग घेऊ शकतील कारण डिजिटल मिडीयाचा वाढत प्रभाव आणि प्रेक्षकवर्ग पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवाय माध्यम प्रतिनिधींना सिनेमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावा आणि चित्रपट महोत्सवांसारखे कार्यक्रम त्यांना प्रभावीपणे कव्हर करता यावे म्हणून फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या संयुत्त विद्यमाने नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी)चे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा आणि पीआयबी पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी शुक्रवारी (8 नोव्हेंबर) रोजी आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली.

20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या चित्रपट महोत्सवाची सध्या गोव्यात जय्यत तयारी सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याच्या कामाने जोर पकडला आहे. यंदा इफ्फीच्या निमित्ताने ईएसजी ते कला अकादमी पणजी पर्यंत रोड परेडचे आयोजन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT