IFFI 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023: वेध इफ्फीचे ! फीचर, नॉन-फीचर चित्रपटांसाठी प्रवेशिका खुल्या

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 20 ते 28 या कालावधीत गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.

Pramod Yadav

IFFI 2023 Goa: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित होणाऱ्या फीचर आणि नॉन फीचर चित्रपटांसाठी प्रवेशिका खुल्या करण्यात आल्या आहेत. चित्रपटांसाठी पात्रता निकष आणि प्रवेशिका दाखल करण्याची प्रक्रिया इफ्फीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.

इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभाग महत्वाचा मानला जातो. 10 ऑगस्टपर्यंत या विभागात फीचर, नॉन-फीचर चित्रपटांच्या प्रवेशिका सादर केल्या जाऊ शकतात. 30 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2023 दरम्यान पूर्ण केलेल्या चित्रपटांनाच यात सहभाग घेता येईल. तसेच, चित्रपटांना इंग्रजी सबटायटल असणे आवश्यक आहे. असे दोन महत्वाचे निकष चित्रपटांच्या निवडीसाठी आहेत.

चित्रपटांची निवड प्रख्यात ज्युरीद्वारे केली जाते. भारतीय भाषांमधील चित्रपटांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश इंडियन पॅनोरमा विभागाचा आहे. फीचर विभागातील 26 आणि नॉन फीचर विभागात 21 चित्रपट निवडले जाणार आहेत.

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NFDC), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्यामार्फत दरवर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. गोव्यात यावर्षी 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी ग्लोबल पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि पदार्पणातील फीचर फिल्म यासाठी प्रवेशिका खुल्या करण्यात आल्या आहे. यासाठी 31 ऑगस्ट 2023 ही प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT