Sankhlim Municipality Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election 2023: भाजपच्या पॅनेलमधील 50 टक्के उमेदवार आमचेच : साखळी कॉंग्रेस गटाध्यक्ष

काँग्रेसकडे निवडणुकीसाठी उमेदवार नाहीत, मुख्यमंत्र्यांचे विधान चुकीचे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanquelim Municipal Council Election 2023: मुळात काँग्रेसकडे साखळी पालिका निवडणुकीसाठी उमेदवार नाहीत, असे मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांचे विधान चुकीचे आहे.

कारण, भाजपाने साखळी पालिका निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे केलेत, त्यातील 50 टक्के उमेदवारांना काँग्रेसची पार्श्वभूमी आहे, असे प्रत्युत्तर देत साखळी नगरपालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व राहिल, असा दावा स्थानिक काँग्रेस गटाध्यक्ष मंगलदास नाईक यांनी केला.

गुरुवारी सायंकाळी, म्हापसा येथील उत्तर गोवा काँग्रेस जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रमेश सेनारी व अंकुश कामत हे उपस्थित होते.

मंगलदास नाईक पुढे म्हणाले की, मुळात साखळी व फोंडा पालिका निवडणूका या पक्ष चिन्हावर होत नाहीत. साखळी निवडणूकीत भाजपाने थेट सहभाग घेत उमेदवार उभे केलेत.

दुसरीकडे टुगेदर फॉर साखळी या पॅनेलद्वारे विरोधकांचे पॅनेल आहे. या पॅनेलचे पुढारी धर्मेश सग्लानी हे काँग्रेसचे नेते आहेत, हे भाजपाने विसरता कामा नये. आणि काँग्रेसकडे नेते किंवा उमेदवारांची कमतरता नाही, असेही ते म्हणाले.

नाईक म्हणाले की, साखळी पालिकेतून आतापर्यंत दोन उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत. यात टुगेदर फॉर साखळी पॅनेलचा उमेदवार आहे. आणि भाजपाचा जिंकलेला उमेदवार हा पूर्वाश्रमीचा आमचाच कार्यकर्ता होता.

मागील ११ वर्षे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळीचे प्रतिनिधित्व करताहेत. मात्र, त्यांना नवीन नेते तयार करता आले नाहीत. त्यामुळे ते काँग्रेसचे कार्यकर्ते पळवताहेत, अशी टीका नाईक यांनी केली.

साखळी पालिका निवडणुकीत भाजपच्या पॅनेलमधील ५० टक्के उमेदवार हे आमचेच आहेत. याचाच अर्थ भाजपकडे स्वतःचे उमेदवार नव्हते, असेही नाईक म्हणाले.काँग्रेस जुना असून, काँग्रेसमुळे इतर पक्ष उदयास आले,असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT