Banking Fraud Dainik Gomantak
गोवा

Banking Fraud: बँक कर्मचारी असल्याचा बनाव; पाच लाखांना गंडा

Banking Fraud: कॅनरा बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून अज्ञाताने संगणकाच्या साहाय्याने मेरशी येथील रमेश काशिनाथ शेट्ये यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून 5 लाख रुपयांना गंडा घातला.

दैनिक गोमन्तक

Banking Fraud: कॅनरा बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून अज्ञाताने संगणकाच्या साहाय्याने मेरशी येथील रमेश काशिनाथ शेट्ये यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून 5 लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांत ओमकुमार मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एका अज्ञात व्यक्तीने तक्रारदार शेट्ये यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन केला आणि तो कॅनरा बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेट्ये यांनी आलेल्या क्रमांकांवर फोन केला. त्यावेळी ज्या व्यक्तीने त्यांना मोबाईलवरून फोन केला होता, ते दोन्ही क्रमांक बंद झाले होते.

त्यांनी कॅनरा बँकेशी संपर्क साधून खातेधारकांची माहिती घेतली जात आहे का, अशी चौकशी केली असता नाही असे उत्तर अधिकृत बँक अधिकाऱ्यांनी दिले.

शहानिशा न करताच दिली संपूर्ण माहिती

कॅनरा बँक खातेधारकांच्या माहितीची पडताळणी करत आहे त्यामुळे ती द्यावी, असे अज्ञाताने सांगितले. तक्रारदाराने त्या व्यक्तीची शहानिशा न करताच बँक खात्याची सर्व माहिती दिली. ती माहिती घेऊन अज्ञाताने शेट्ये यांच्या बँक खात्यावरून इतर बँकांमधील खात्यांवर ५ लाख रुपये ट्रान्स्फर केले. जेव्हा शेट्ये यांना त्यांच्या बँक खात्यावरील पैसे ट्रान्स्फर झाल्याचे मेसेज आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT