NCB seizes 1 kg of cocaine in Goa  Dainik Gomantak
गोवा

Drugs seizes At Dabolim Airport : दाबोळी येथे 5 कोटींचे कोकेन जप्त; ‘एनसीबी’ची कारवाई

दिल्लीसह गोव्यात दोघे विदेशी गजाआड

दैनिक गोमन्तक डिजिटल

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने ड्रग्स तस्करीप्रकरणी गुरुवारी रात्री दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा टाकून सॅम्युएल या केनियन नागरिकाला अटक केली.

त्याच्याकडून 1.009 किलो कोकेन जप्त केले असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 5 कोटी आहे. या प्रकरणाचा तपास करतानाच एनसीबीच्या दिल्लीतील पथकाने जेम्स ईसी या नायजेरियनालाही अटक केली आहे. दाबोळी विमानतळावरील तपासणीवेळी कस्टम अधिकाऱ्यांनी संशयावरून केनियन नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. नंतर त्याच्या साथीदारालाही पकडले.

साथीदाराच्याही मुसक्या आवळल्या

सॅम्युएलची चौकशी केली असता त्याने हे कोकेन दिल्लीतील एका नायजेरियनाला देण्यासाठी आणले होते. त्यामुळे एनसीबीच्या दिल्लीतील शाखेला याची माहिती देण्यात आली. दिल्ली विमानतळावर सॅम्युएलच्या प्रतीक्षेत असलेल्या नाजयेरियनाचा शोध सुरू केला.

एनसीबीने कोकेन साठा दिल्लीत पोचण्याआधीच सॅम्‍युएलला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याच मदतीने जेम्स ईसी याला अटक केली. हे ड्रग्सचे आंतरराष्‍ट्रीय जाळे असल्याने चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT