Goa Covid-19 Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: पुन्हा चिंता वाढली; कोरोनाचे सलग दुसऱ्या दिवशी पाच बळी

कुळे पोलिस स्थानकाशी संबंधित बारा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Goa Covid-19) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: राज्यात (Goa) नव्या कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात सलग 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे एका बाजूला दिलासा मिळत असताना दुसरीकडे काहीशी चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोना पॉजिटीव्हीटी दर 2 टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे आरोग्य खाते काही प्रमाणात समाधानी आहे. (5 corona victims died in two consecutive days In Goa)

दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणही (Vaccination) सुरू आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 3,753 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहीर अहवालानुसार काल 97 नवे कोरोनाबाधित सापडले, तर 129 कोरोनाबाधित बरे झाले. काल 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 3,123 झाली आहे. आजच्या दिवशी 1,376 सक्रिय कोरोनाबाधित असून कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी 97.36 वर पोचली आहे.

9,116 जणांचे लसीकरण : राज्यात 18 वर्षांवरील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील 12,14,125 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस 9,82,966 नागरिकांनी घेतला असून 2,31,159 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 22 रोजी 9,116 लसीकरण झाले. त्यात 4,229 नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर 4,887 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

कुळे स्थानकातील 12 पोलिस कोरोनाबाधित

कुळे पोलिस स्थानकाशी संबंधित बारा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व कोविडबाधित पोलिस कर्मचारी सुरक्षित असून लक्षणविरहीत असल्याने त्यांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांनी कोविडविरोधी लसही घेतली होती. मात्र, त्यांना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT