Crime Dainik Gomantak
गोवा

Accidental Death in Ponda : फोंड्यात 36 तासांमध्ये 5 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद

पाच घटनांपैकी तीन घटनांमध्ये तीन वेगवेगळ्या जागी मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं होतं, तर एकाचा झाडावरुन पडून आणि अन्य एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Accidental Death in Ponda : फोंडा परिसरात 36 तासांमध्ये 5 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी फोंडा पोलिसांनी याप्रकरणी नोंद करुन तपास सुरु केला आहे. या पाच घटनांपैकी तीन घटनांमध्ये तीन वेगवेगळ्या जागी मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं होतं, तर एकाचा झाडावरुन पडून आणि अन्य एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता. यातील 3 घटना शनिवारी तर उर्वरित 2 रविवारी नोंद करण्यात आल्याची माहिती फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिले आहे.

फोंडा तालुक्यातील आमाडी केरी येथे राहणाऱ्या उमेश गावडे या 47 वर्षीय व्यक्तीचा झाडावरुन पडून मृत्यू झाला होता. रविवारी झाडावरुन पडल्यानंतर लागलीच त्यांना रुग्णालयात नेलं जात होतं, मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत फातोर्ड्यातील 83 वर्षीय पंढरी वराडकर यांचा मृतदेह तामशिरे, बोरी परिसरात झुआरी नदीत तरंगताना आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वराडकर हे रुग्णालयात दाखल होते आणि उपचारांनंतर शनिवारपासून बेपत्ता होते.

दरम्यान बेतोडा परिसरात खुल्या चेंबरमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता. एक दिवसाआधीच या चेंबरचं उद्घाटन मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या चेंबरला उघडं सोडल्याने त्यात पडून नारायण मनोहर राहणार येळ्ळूर बेळगाव यांचा मृत्यू झाला आहे. दारुच्या नशेत चेंबरमध्ये पडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर अन्य एका घटनेत 50 ते 55 वर्षीय अज्ञात व्यक्तीला मृतावस्थेत फोंडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. तर गिरीश शांतप्पा या माशेलात बेकरीमध्ये 20 वर्षीय कामगाराला मडकईतील आरोग्य केंद्रावर आणण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT