Well collapsed At Querim Sattari Dainik Gomantak
गोवा

Querim Sattari: अनर्थ टळला! केरी-सत्तरीतील ४५ वर्षे जुनी विहीर कोसळली

Well collapsed At Querim Sattari: विहिरीच्या बाजूला असलेल्या दुकानातील काही साहित्‍य या विहिरीत पडून नुकसान झाले

गोमन्तक डिजिटल टीम

Querim Sattari Well Collapsed

वाळपई: दोन माड, केरी-सत्तरी येथे असलेली ४५ वर्षांपूर्वीची विहीर सकाळी अचानक कोसळली. त्‍यामुळे विहिरीच्या बाजूला असलेल्या दुकानातील काही साहित्‍य या विहिरीत पडून नुकसान झाले. दरम्‍यान, ही विनावापर धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्‍यक्त केले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, दोन माड परिसरात बाजाराच्या मधोमध असलेली ही जुनी सरकारी विहीर पडीक आहे. त्‍यातील पाणी प्रदूषित असल्‍याने लोक त्‍याचा वापर करत नाहीत. आज अचानक ती कोसळली. सदर विहीर बसस्थानकापासून जवळच आहे.

दरम्‍यान, आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या प्रकाराची दखल घेऊन लोकांना कोणताही त्रास होऊ नये म्‍हणून कोसळलेली सदर विहीर ताबडतोब बुजविण्‍याचा आदेश दिला. त्‍यानुसार काम सुरू झाले आहे.

डॉ. दिव्या राणे, (आमदार, पर्ये)

पर्ये मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची समस्या ही माझी समस्‍या आहे. कोसळलेली विहीर धोकादायक होती. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यानुसार बांधकाम व जलसिंचन खात्यांच्या साहाय्याने ती कायमची बुजविण्यात येत आहे. लोकांना दुसरी विहीर हवी असल्‍यास त्‍यासाठी प्रयत्‍न करेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT