Credit card Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: क्रेडिट कार्ड नूतनीकरणाच्या बहाण्याने 4.10 लाखांची फसवणूक; कोलवा पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

Goa Crime News: क्रेडिट कार्ड नूतनीकरणाच्या बहाण्याने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फसवणूकीच्या घटना समोर येतायेत. यातच आता क्रेडिट कार्ड नूतनीकरणाच्या बहाण्याने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नामदेव बामनवडकर यांची तब्बल 4.10 लाखांची फसवणूक करण्यात आली. कोलवा पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

दरम्यान, बामनवडकर यांनी फसवणूकीची तक्रार कोलवा पोलिस ठाण्यात नोंदवली होती. 31 जानेवारी रोजी वार्का येथे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कार्डचे नूतनीकरण करायचे असल्याचे सांगितले. त्याने संगणकाचा वापर करत 4 लाख 10 हजारांची रक्कम केपे येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) खात्यात वळवली. याप्रकरणी कोलवा पोलिसांकडून तक्रारीनुसार आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

5.7 कोटींचा गंडा घालणाऱ्या व्यक्तीला अटक

काही दिवसांपूर्वीच गोमंतकीयांना तब्बल 5.7 कोटींचा गंडा घालून गेल्या एका वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्या. सोन्याच्या व्यापारातून फायदेशीर परतावा आणि कमी दरात सोने देण्याचे आश्वासन पकडण्यात आलेल्या आरोपींनी दिले होते. गोवा पोलिसांच्या (Goa Police) गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. गेल्या वर्षापासून हे दोघेही आरोपी फरार होते. मात्र अखेर त्यांना अटक करण्यात आली. एप्रिल 2023 पासून पोलिस त्या दोघांच्या शोधात पोलिस होते. हे दोघेही आरोपी मुंबईचे रहिवाशी होते.

गोमंतकीयांची फसवणूक केलेल्या आरोपींची नावे अनुक्रमे अक्षय सावंत आणि पल्लवी घाडगे अशी आहेत. त्यांनी सोन्याच्या व्यापारातून चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन गोमंतकीयांची फसवणूक केली होती. त्यांनी गोव्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवले होते. कमी दरात सोने उपलब्ध करुन देऊ असे आरोपींनी त्यांना सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT