Crime News Dainik Gomantak
गोवा

गोव्यात जाऊन ईद साजरी करणार होते; खंडणी न दिल्याने दुकानदारावर चौघांचा चाकू हल्ला

डोक्यावर पडले 8 टाके; मध्यस्थी करणाऱ्या दुकानचालकाच्या भावालाही मारहाण

Akshay Nirmale

Pune Crime: मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद काही दिवसांवर आला आहे. दरम्यान, या सणासाठी देणगी देण्यास नकार दिल्यावरून एका मोबाईल फोन दुकान मालकासह त्याच्या भावाला चार तरूणांनी मारहाण केली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले गेले आहेत.

यात मोबाईल दुकानाचा 24 वर्षीय मालक जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी अमान खान (वय 21), हाफिज शेख (वय 21), हमजा शेख (वय 19) आणि मोहम्मद खान (वय 19) यांना अटक केली आहे. हे चौघेही नाना पेठेतील रहिवासी आहेत. पैकी अमान खान आणि हमजा शेख हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात ईद साजरी करण्यासाठी त्यांनी मोबाईल शॉप मालकाकडे "देणगी" मागितली होती. सोमवारी हा प्रकार घडला होता. दोन्ही भाऊ दुकानात असताना हे चार तरूण तिथे आले.

त्यांनी ईद साजरी करण्यासाठी देणगी मागितली. यावेळी संशयित आरोपींनी या दोन्ही भावांना मागणी पूर्ण न केल्यास दुकानाची तोडफोड करण्याची आणि चेहरे विद्रूप करण्याची धमकीही दिली

त्यानंतरही दुकानमालक भावडांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चौघा तरूणांनी त्या दुकानमालकांशी भांडण्यास सुरवात केली. चौघांपैकी एकाने शेजारच्या गॅरेजमधून धारदार शस्त्र आणले आणि दुकान मालकावर हल्ला केला. यात दुकान मालकाचे डोके आणि हाताला दुखापत झाली आहे.

दुकान मालकाच्या भावाने या भांडणात मध्यस्थीचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावरही या चौघांनी हल्ला केला. हल्ला करून पळून जाण्यापुर्वी त्यांनी दुकानातील लॅपटॉपही फोडला. त्यानंतर दुकानदाराने याबाबत पोलिसात तक्रार दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT