Cyclists from Pune Dainik Gomantak
गोवा

Age Is Just Number! साठी उलटलेल्या चौघांनी सायकलवरुन केला पुणे-गोवा प्रवास; नागेशी सप्ताहाला लावली हजेरी

Pune Goa Cycle Tour: या चौघांनी आपल्या सायकली पुण्यातून दामटल्या व कराड, मलकापूर, अनुस्करा घाटातून राजापूरमार्गे गोवा गाठले

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: इच्छाशक्ती असेल तर वयाचे बंधन आडवे येत नाही. हवी असते ती केवळ जिद्द आणि उमेद. पुण्यातील चार ज्येष्ठ नागरिकांनी ही दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत थेट सायकलवरून गोव्‍यातील फोंडा तालुक्‍यामधील नागेशी येथील प्रसिद्ध भजनी सप्ताहाला उपस्थिती लावली आणि सर्वांना चकीत केले. एवढा मोठा प्रवास करूनही या ज्‍येष्‍ठांच्‍या चेहऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा शीण नव्‍हता, हे विशेष.

अरुण नेवशे, दत्तात्रय पोतदार, निरुपमा भावे आणि जयश्री जाधव या पुण्‍यातील चारही सायकलमित्रांनी साठी उलटली तरी अजूनही आपण ‘फिट’ आहोत हे दाखवून देत चार दिवसांत पुणे ते गोवा अंतर कापले. या चौघांनी आपल्या सायकली पुण्यातून दामटल्या व कराड, मलकापूर, अनुस्करा घाटातून राजापूरमार्गे गोवा गाठले.

गेल्या शुक्रवारी १६ तारखेला सकाळी ६ वाजता त्‍यांनी पुण्यातून प्रयाण केले होते व सोमवारी १९ रोजी त्यांनी गोवा गाठले ते थेट नागेशी. तेथे श्री नागेश महारुद्राचे दर्शन घेतले. ‘सर्व काही पावले’ असा भाव त्‍यांच्‍या चेहऱ्यावर होता.

सायकल चालवण्याचा अनुभव आणि उत्साही वृत्ती यामुळे हा सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास खूप चांगला झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्‍यक्त केली. वाटेत चहा-नाश्‍ता, भोजन व आवश्‍यक त्या ठिकाणी जरासा विसावा घेतला. पुन्हा नव्या दमाने सायकल दामटली. हे चौघेही सेवानिवृत्त आहेत.

निरुपमा भावे विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर सायकल भ्रमंती सुरू केली. चौघांचीही ओळख सायकल फेरीतच झाली, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी अशी महाराष्ट्रातच सायकलवरून अनेकवेळा भ्रमंती केली आहे.

हवी असते ती प्रबळ इच्छाशक्ती

अरुण नेवशे, दत्तात्रय पोतदार, निरुपमा भावे आणि जयश्री जाधव या चौघांनीही नागेशी गाठल्यानंतर श्री नागेश देवाचे दर्शन घेतले. तसेच भजनी सप्ताहाला उपस्थिती लावली. परमेश्‍वराचे अधिष्ठान असेल तर काहीही अशक्य नाही. एवढा मोठा पल्ला या वयात कसा काय तुम्ही गाठला, असे विचारल्यावर ‘हवी असते ती इच्छाशक्ती’ असे उत्तर मिळाले. खरेच अशा ज्येष्ठांना सलाम!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

SCROLL FOR NEXT