National Games Goa 2023 
गोवा

National Games Goa 2023: असा असेल PM मोदींचा महाराष्ट्र आणि गोवा दौरा, क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभात विशेष काय?

गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान मोदी 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील.

Pramod Yadav

National Games Goa 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (26 ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि गोव्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात (अहमदनगर) जाऊन पूजा करतील.

यानंतर अहमदनगर येथील निळवंडे धरणावर दुपारी 2.15 वाजता जलपूजन करण्यात येणार आहे. धरणाच्या बांधकामाला झालेल्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना या धरणाच्या पाण्यासाठी तब्बल 53 वर्षे वाट पाहावी लागत होती, ही प्रतीक्षा आता संपणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी दुपारी 3.30 वाजता शिर्डीतील काकडी मैदानावर कोट्यवधी किंमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी शिर्डीहून गोव्याला येणार आहेत. गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान मोदी 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील.

गोव्याची विंड सर्फर कात्या कोएल्हो गुरुवारी येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द करतील, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले.

फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पाच तास हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी सुखविंदर सिंग आणि हेमा सरदेसाई यांच्यासह प्रसिद्ध कलाकार सादरीकरण करणार आहेत.

यामध्ये सहभागी होणाऱ्या 28 संघातील खेळाडू परेड करतील. 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या महाकुंभात विविध खेळातील सुमारे 10 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेवर आधारित यात 600 कलाकार सहभागी होणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

अरुणाचल प्रदेश, आसाम आणि ओडिशाचे क्रीडा मंत्री उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2009 पासून या खेळांच्या आयोजनाची वाट पाहत होतो, 12 वर्षांनंतर या खेळांचे आयोजन करत आहोत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT