37th National Games Goa 2023 Mashaal Launching 
गोवा

37th National Games Goa 2023: गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल प्रज्वलित

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करण्यात आले.

Pramod Yadav

37th National Games Goa 2023 Mashaal Launching: गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा मशाल प्रज्वलन कार्यक्रम आज राजभवन दरबार हॉल येथे पार पडला. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करण्यात आले. गोव्याची आंतरराष्ट्रीय सेलर कात्या कुएल्हो हिच्या हातून मशाल राज्यपालांच्या हाती देण्यात आली.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

यावेळी राज्याचे मुख्यमंत्राी प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, केंद्रीयमंत्री खासदार श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या झेंड्याखाली विविध खेळांच्या राज्य संघटनांनी तीव्र निषेध नोंदविताना शुक्रवारी होणाऱ्या स्पर्धा मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकू नये असे आवाहन केल्यानंतर संघटनांनी बहिष्कार मागे घेतला.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

खेळाडूंसाठी प्रशिक्षण-सराव शिबिरे, क्रीडा उपकरणे खरेदीसाठी विविध संघटनांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही अजून ते पाळलेले नाही.

खेळाडूंसाठी राज्य सरकारने अजून निधी पुरवलेला नाही. त्यामुळे निवासी शिबिर सुरू करणे अशक्य असल्याचे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याची माहिती जीओए सचिव गुरुदत्त भक्ता यांनी दिली. त्यामुळे मशाल कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गोवा ऑलिम्पिक संघटनेने घेतला होता.

दरम्यान, क्रीडा संघटनांना निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर संघटनांनी मशाल अनावरण कार्यक्रमावरील बहिष्कार मागे घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT