37th National Games Dainik Gomantak
गोवा

National Game Audit : क्रीडा स्पर्धेच्या खर्चाचे ऑडिट करा : काँग्रेस

कारण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्य निविदा दिली गेली, तीही व्यक्ती गुजरातमधील आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

National Games Audit : पणजी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी राज्य वित्त नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया करायला हवी होती, ती झाली नाही. केवळ दोनच देकार आल्यास पुन्हा निविदा प्रक्रिया करावी लागते, ती केली गेली नाही.

कारण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्य निविदा दिली गेली, तीही व्यक्ती गुजरातमधील आहे.

या क्रीडा स्पर्धेच्या खर्चाचे ऑडिट व्हायला हवे, अन्यथा न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते कॅप्टन विरियातो फर्नांडिस, ॲड. श्रीनिवास खलप यांची उपस्थिती होती. विरियातो म्हणाले, या क्रीडा स्पर्धेसाठी किमान दीड हजार कोटींचे बजेट असल्याचे म्हटले जाते.

त्यातील गुजरातच्या कंपनीला किती पैसा मिळाला? मुख्य देकार असलेल्या कंपनीने जी उप कंपन्यांची सेवा घेतली आहे, ती सेवाही बाहेरील व्यावसायिकांना दिली आहे.

गोव्यातील व्यावसायिकांना या सेवा का दिल्या गेल्या नाहीत, त्यांच्या फायद्याचा विचार का केला गेला नाही?

‘साधनसुविधा दुय्यम दर्जाची’

क्रीडा स्पर्धेसाठी उभारण्यात आलेली साधनसुविधा दुय्यम दर्जाची जर्मन तंत्रज्ञानाची आहे. या सुविधा उभारल्या त्या तात्पुरत्या असून येथील खेळाडूंना पुढे त्याचा कसा फायदा होणार, असा सवाल त्यांनी केला.

माध्यम प्रतिनिधींना चहाची सोयही केली नव्हती. याशिवाय जे स्वयंसेवक नेमले होते, त्यांना वेळेत जेवण, पोलिसांना पाण्याची सोय करण्यात आली नाही, असेही विरियातो म्हणाले,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Goa Crime: ‘सोनारा’ने घातला 23 लाखांचा गंडा! अनेकांची फसवणूक; पेडणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

SCROLL FOR NEXT