National Games Goa 2023
National Games Goa 2023

National Games Goa 2023: 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचा आत्तापर्यंतचा लेखाजोखा

तायक्वांदोसाठी खरेदी केलेल्या मॅट्स निकृष्ट
Published on

National Games Goa 2023: बीच फुटबॉल आणि वुशूमध्ये गोव्याने एक-एक रौप्य पदक जिंकले. गतकामध्ये कांस्यपदक मिळण्याची हमी असताना फोंडा इनडोअर बहुउद्देशीय स्टेडियमवर तायक्वांदो अधिकाऱ्यांनी खराब दर्जाच्या मॅट्समुळे हैराण झाले. तर, फातोर्डा स्टेडियमवर कर्नाटक विरोधात पुरुष फुटबॉल सामन्यात गोव्याचा 0-1 असा पराभव झाला.

आठव्या दिवसाअखेर पदक तालिकेत गोवा एक स्थान घसरून बाविसाव्या स्थानावर गेला आहे; महाराष्ट्र अव्वल स्थानावर कायम असून, सर्व्हिसेस आणि हरियाणा प्रत्येकी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या ताज्या यादीनुसार आत्तापर्यंत गोव्याला एकूण 35 पदकं मिळाली आहेत. यामध्ये 02 सुवर्ण, 07 रौप्य आणि 26 कांस्य पदकं मिळाली आहेत. गोव्याने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदकांची कमाई केली आहे.

तायक्वांदोसाठी खरेदी केलेल्या मॅट्स निकृष्ट दर्जाच्या होत्या, अधिकाऱ्यांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ गोवा (TAG) च्या मॅट्स वापरण्यास भाग पाडले. “मॅटचा दर्जा खराब असल्याने आम्हाला TAG कडे उपलब्ध मॅट्सवर अवलंबून राहावे लागले,” असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

National Games Goa 2023
नुवेतील नवज्योती पुनर्वसन केंद्र! लैंगिक शोषणचा बळी व वेश्याव्यवसायात गुरफटलेल्या महिलांचे हक्काचे घर

“आमच्याकडे असलेल्या मॅट्सचा सरावासाठी वापर केला जात होता. पण मला याबाबत अधिक काही बोलायचे नाही. मला आनंद आहे आणि आशा आहे की गोव्याची प्रतिमा डागाळणार नाही,” असे TAG चे सचिव नवीन रायकर म्हणाले.

फोंडानंतर फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर गोव्याने सलग दुसरा सामना गमावला, दरम्यान पंजाबविरुद्धचा सामना बाकी असला तरी गटातून पात्र होण्याची शक्यता धूसर आहे. गोव्याने कोलवा येथे सुवर्णपदक जिंकले असते तर फोंडा आणि फातोर्डा येथील अपयश झाकता झाले असते.

बीच फुटबॉल लीग झालेल्या भारतातील मोजक्या राज्यांपैकी एक असलेले केरळ सुरुवातीला गोव्यापेक्षा 3-5 असे पिछाडीवर होते. पण, अनुभव सार्थ ठरवत त्यांनी केवळ बरोबरीच केली नाही तर दोनदा गोल करून 7-5 असा विजय मिळवला.

गोव्याच्या प्रमोद खांडेपारकरने हरियाणाच्या खेळाडूचा 40-36 असा पराभव करून गतकामध्ये कांस्यपदक पटकावले, परंतु रौप्य किंवा सुवर्णपदकांच्या लढतीत मध्य प्रदेशकडून 41-44 असा पराभव पत्करावा लागला.

“मी हा खेळ फक्त तीन महिन्यांपूर्वी शिकायला सुरुवात केली होती आणि मिळालेल्या पदकामुळे आनंद झालाय पण, सुवर्णपदकाने मला नक्कीच खूप बळ मिळाले असते,” असे प्रमोदने सांगितले.

“मला कांस्यपदक मिळाले आहे आता मी अधिक सराव करेन आणि मला खात्री आहे की यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल,” असेही तो म्हणाला.

"मी त्याच्या कामगिरीवर खूश आहे आणि इतरांनीही उत्तम कामगिरी करून राज्यासाठी पदकं मिळवावीत," अशी अपेक्षा गोव्याच्या गतका असोसिएशनचे सचिव सबी फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

गोव्याची मुष्टियोद्धा सुमन यादवचा एलिट महिलांच्या 53-4 किलो गटात राजस्थानच्या खानम अर्शी हिच्याकडून 4-1 ने पराभव झाला.

- अगस्तो रॉड्रिग्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com