Mobor Beach  Dainik Gomantak
गोवा

Fatorda: 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन भोवलं, बीचवरून हॅन्डबॅगसह दोन लाखांचा ऐवज लंपास

एक्टिवा स्कुटरची चोरी प्रकरणी मडगाव येथे एकाला अटक

Pramod Yadav

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यातील समुद्र किनारे फुल्ल झाले होते. याचकाळात मोठ्याप्रमाणावर चोरटे देखील सक्रिय झाले व त्यांनी महागड्या वस्तू आणि पर्यटकांच्या पैशावर डल्ला मारल्याच्या घटना घडल्या.

आपल्या मुलीचे मोबोर या ठिकाणी दोन लाख रुपये ऐवजाचे किमती सामान असलेले हॅन्डबॅग अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार एका व्यक्तीने कोलवा पोलीस स्थानकात दाखल केली आहे. हा प्रकार 31 डिसेम्बरच्या रात्री घडला होता.

रवींद्र कुमार रॉय असे तक्रारदाराचे नाव असून मोबोर येथील समुद्र किनाऱ्यालगत एका अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीचे हॅन्डबॅग चोरून नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे .

या हॅन्डबॅग मध्ये सुवर्ण अलंकार , मोबाईल फोन, घड्याळ आणि रोख पाच हजार रुपये मिळून एकंदरीत दोन लाख रुपये किमतीचा ऐवज होता असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे . प्रकरणी कोलवा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

एक्टिवा स्कुटरची चोरी प्रकरणी मडगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे .

मूळ कोल्हापूर येथील अविनाश मारुती पाटील (30) असे या संशयित आरोपीचे नाव असून मडगाव पोलिसांनी 31 डिसेम्बरच्या रात्री आके येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ रात्रीच्या 10 वाजण्याच्या दरम्यान गस्तीवर असताना ही कारवाई केली आहे . त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आलं आहे . या प्रकरणी मडगाव पोलिसांकडून पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT